पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर बाकी इतर देशांकडे नेहमी फिरते. या वाकीबद्दल व्यापारी त-हेचा मोबदला येत नाही. ह्या वाकीची फेड होते ती अशीः-(१) बाकी पैकी काही अंशावद्दल सोने व रुपें ही येतात. या देशांतील लोकांस अनेक ऐतिहासिक कारणांनी दागिन्याचे किंवा नाण्याचे स्वरूपाने द्रव्यसंचय करून जवळ बाळगून ठेवण्याची संवय झाली आहे; तेव्हां वाकीबद्दल येणाऱ्या सो- न्यारुप्यापैकी काही नाणे पाडण्याकडे जातें व काही दागिन्याकडे खपते. (२) कांही वाकीपासून हिंदुस्थानचे राज्यव्यवस्थेबद्दल विलायतेस जो खर्च होतो व याचेसाठी इकडून तिकडे जी रकम पाठवावी लागते त्याची या वाकांच्या योगाने परस्पर व्यवस्था होते. विलायतेस गेलेले मालाचे किमतीबद्दल तेथील व्यापाऱ्यांस इकडे रक्कम पाठवावयाची असते व हिंदुस्थानसरकारास विलायतेस हिंदुस्थानचे स्टेटसेक्रेटरीकडे सांगितलेप्रमाणे रक्कम पाठवावयाची असते, यामुळे मोठी सोय होते ती अशी की, स्टेटसेक्रेटरी हे व्यापारी लोकांपासून विलायतेस पैसे घेऊस त्यांस हिंदुस्थानसरकारचे तिजो- रीवर हुंड्या देतात; व्यापारी लोक त्या हुंड्या हिंदुस्थानांत पटवून त्या पैशाने मालाचे किमतीची फेड करितात. हिंदुस्थानसरकारास विलायतेस कोणते कारणासाठी पैसे पाठवावे लागतात त्याबद्दल माहिती फिनान्सचे भागांत (जमा- वंदीचे भागांत) दिली आहे, तेव्हां त्याबद्दल येथे फिरून सांगण्याचे कारण नाही. राज्यव्यवस्थेचा खर्च, लष्करखर्च, हिंदुस्थान देशाची सांपत्तिक स्थिति सुधारण्यासाठी सरकाराने स्वतः किंवा कंपन्यांस हमी देउन विलायतेंत कर्ज काड्न आगगाड्या, कालवे, वगैरे कामें करविली आहेत त्यांचा व्याजाचा वगैरे खर्च, असें अनेक खर्च असतात. (३) याशिवाय खासगी लोकांनीही या देशांत कार- खाने काढण्यासाठी विलायतेस पुष्कळ कर्ज काढले आहे व त्याचे व्याजाची रक्कम तिकडे पाठवण्याची असते, त्याचे फेडीसही ही व्यापाराची बाकी उप- योगी पडते. असे प्रकाराने या व्यापाराचे वाकीपासून हिंदुस्थानास राज्य- व्यवस्थेचे संबंधानें, किंवा सांपत्तिक स्थिति सुधारण्यासाठी झालेले खर्चासंबंधा- ने, विलायतेस जी रक्कम पाठविण्याची असते तिची फेड होते. आतां ही व्या- पाराची बाकी किती राहते व तिचेबद्दल सोने-रुपें किती येतें, सरकारी व खासगी देण्यांत किती रक्कम जाते यावद्दल माहिती देतो. खालील पत्रकांत माहिती सन १८७०-७१ पासन १८९२-९३ पर्यंतची आहे. आंकडे लक्ष रुपयांचे आहेत.