पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३०५) तीळ-फ्रान्स देशास फार जातो. तेथे त्याचा सावण करण्याचे कामों उपयोग करतात. काही थोडा वेलजन, जर्मनी, इटली वगेरे देशांस जातो. गाळेताचे धान्याचा व्यापार निम्मेपेक्षा जास्त मुंबई बंदराशी होतो. रेशीम-मुख्यत्वे विलायतेस व फ्रान्स देशास जाते. ते बहुतेक बंगाल्यांतूनच जाते. लोंकर-लोकर जाते ती फार हलके प्रकारची असते व जाडाभरजा माल तयार करण्यासाठीच तिचा उपयोग होतो. इकडून जाणारे लोकरांत केस व मातीची भेसळ करतात, त्यामुळे या व्यापाराचे वृद्धीस हरकत येते असे दिसते. या देशांत लोकरीचे कापड काढणान्या पांच गिरण्या आहेत, त्यांत जाडे का- पडच फार निघतें. लोकर मुंबई व कराची बंदरांतून विशेष जाते; ती बहुतेक विलायतसच जाते. वर्ग सातवा-तयार केलेला माल-या प्रकारचे मालांत अलीकडे पहिला नंबर सूत, कापड वगैरे कापसाचे मालाचा आहे. त्याचे खालोखाल जूटचे (ता- गाचे) कापड व पोती व कमावलेली कातडी यांचा येतो. या दोन प्रकारचे मालांत कधीं जूटचा ( तागाचा ) माल जास्त जातो व कधी कमावलेलों का- तडी जास्त जातात. त्यांचे खाली लाख, रेशमी कापड, काथ्याचा माल, लोक- रीचा माल व पोषाखाचें सामान वगैरे जिन्नस येतात. ही नवरवारी नेले चार सालांचे आंकड्यांवरूनच लावलेली आहे. कापसाचे सूत-हें विशेकरून चिनांत जातें; जपान, स्ट्रेट्स सेट उमेंट व एडन व एशियांतील दुसरे देश यांतही काही जातें. कापड-हें विशेषेकरून चीन, एडन, आफ्रिकेचा पूर्व किनारा, स्ट्रेट्स् सेटलमेंट, एशियांतील तुर्कस्थान, अरवस्थान, इराण, सिलोन, वगैरे देशांस जाते. हिंदु- स्थानांतील गिरण्यांची वाढ कशी झाली तें खाणी व कारखाने या भागांत सां- गितले आहे. जुटाचा ( तागाचा) माल-तागाचे तयार मालाचा व्यापार वाढत आहे. हा माल दोन प्रकारचा असतो. पोती व पोत्याचे कापड. पोतों विलायत, युनाय- २०