पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्रिमियाचे लढाईचे (३०४ ) स्पेन वगैरे यरोपांतील देश व चीन व जपान हे एशियांतील देश यांस जातो. कापूस विलायतेस फार थोडा जाण्याचे व जपानांत जास्त जाउं लागण्याचे कारण पूर्वा सांगितलेच आहे. फ्रान्स, इटली, व आनिया देशांत कापूस जा- ण्याचे प्रमाण कमी झाले नाही. जर्मनी व बलजम देशांस कापूस फार जाऊं लागला आहे. कापसाचा व्यापार बहुतक मुंबई बंदरांतून होतो. जूट-(ताग -या जिनसाचा व्यापार फार अनिश्चित असतो. बंगाल्यांत ल एका भागांत मात्र जूटची ( तागाची) लागवड करतात, त्यामुळे त्या भागांत पर्जन्याची आप्ती किंवा सुवत्ता असल त्या मानानें तो उत्पन्न होतो. तांदूळ वगैरे जिन्नस देशाचे वरेच भागांत होत अ ल्या कारणाने त्या मालाचे पुरवठ्यो- स विशष खूट येत नाही; तसें जूट (तागाचे ) नसल्यामुळे व्यापारांत उत्पन्नाचे मानाने नेहमी चलबिचल असते. विलायत, युनायटेड स्टेट्स् , जर्मनी, फ्रान्स, इटली, आस्त्रिया, स्पेन वगैरे देशांत इकडून जूट ताग) जातो. यनायटेड स्टेट्स्मध्ये पूर्वीपेक्षां तो हल्लों कमी जातो; पण जर्मनीत जास्त ज,ऊं लागला आहे. वेळी जूट ताग) रशियांतून विलायतेस जाणे बंद झाले व त्या वेळी तो या देशांतून तिकडे जाण्यास सुरवात झाली. हा व्यापार कलकत्ताबंदरांतनच होतो. कातडों -हा व्यापार बहुतेक युरोपांतील आत्रेया, फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांशी होतो. इकडे चांगली सुबत्ता असली ह्मणजे कातडी कमी जातात व दुष्काळ पडला ह्मणजे ती जास्त जातात. मेंढरें व वकऱ्यांचों कातडी अमारेकेंत विशेष जातात व माठे जनावरांची कातडौं इतर देशांस जास्त जातात. कातड्यांचा व्यापार बहुतेक बंगाल्यांतून होतो. खताचे जिन्नस-हाडे विलायतस व जर्मनी या देशांस विशेष जातात; थोडी थोडी इतर देशांसही जातात. सन १८९३-९४ साली हाडे २७४० हजार रुपये किंमतीची गेली व इतर खताचें सामान ६७ हजार रुपयांचे किंमतीचें गेलें. चिये- एरंडी ही मख्यत्वेकरून फ्रान्स देशास जाते, व त्यापेक्षा कमी विलायत, बेलजम, इटली, रशिया वगैरे देशांस जाते भुइमूग-मुख्यत्वेकरून, फ्रान्स, वेलजम देशांस जातो. जवस-निम्मेचे जवळ जवळ जवस विलायतेस जातो त्याचे खालोखाल फ्रान्स देशास जातो. काही थोडा युरोपांतील वाकीचे सर्व देशांस जातो. पूर्वी युनायटेड स्टेट्स् देशास जवस फार जात असे; आतां तिकडे फारच कमी जातो. ह्याचे कारण पूर्वी सांगितलेच आहे. मोहरी व घोडेराई -ही फ्रान्स, बेलजम, व जर्मनी देशांस विशेष जाते.