पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चहाच व्यापारांत ( ३०३) चा खप कमी झाला नाही ; त्याचा खप साखर करण्यासाठी होईनासा झाल्या- पासून ता फार स्वस्ती झाला आहे व त्याचा ह्या देशांतच खप फार वाढला आहे. चहा-चहाची लागवड कोणकोणते प्रांतांत होते तें शेतकीच भागांत सांगितलेच आहे. हिंदुस्थानांतून विलायतेंत फार चहा जातो. थोडा आस्त्रिया व इराणांत जातो. युनायटेड स्टेट्समध्ये जास्त चहा जाऊ लागला आहे. हिं- दुस्थानातील चहाचा चिनाचे चहापेक्षां विलायतेस जास्त खप होऊ लागला आहे. या व्यापारासंबधे हिंदुस्थान व सिलोन यांमध्ये चढाओढ होईल असे अनुमान आहे. सन १८९१-९२ साली हिंदुस्थानांतून जितका चहा गेला त्याचे निम्मे सिलोनढून परदेशांस गेला. इंग्रजी राज्यांतील बंदरांतून चहा पर शास रवाना झाला, त्याशिवाय लाव्हणकार व कोचीन या प्रांतांताल वंदरांतून लक्ष पौंड चहा सन १८९३ साली परदेशास रवाना झाला. सारखी वाढच आहे. वर्ग तिसरा-धातू व धातूचे पदार्थ-यासंबंधाने विशेष असे काही नाही. या देशांत कोणत खनिज पदार्थाची उत्पत्ती होते तें खाणी व कारखाने या भागांत सांगितले आहेच. वर्ग चवथा-औषधे व अमली पदार्थ-अफू-अफूचे संबंधाने विशेष माहिती दहावे भागांत दिली आहे. अफू चीन, स्ट्रेट्स सेटलमेंट, कोचीन चायना, वगैरे देशांत जाते. नळि--नीळीबद्दल शेतकीचे भागांत माहिती दिली आहे. नीळ विलायत, आस्त्रिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, इजिप्त, युनायटड स्टेट्स, इगण, एशियांतील तुर्कस्थान, वगरे देशांस जाते. विलायतेस जास्त ह्मणज एकंदरीपैर्की सुमारे एकतृतयिांश जाते. वर्ग पांचवा--तेलें,-खोबरेल व एरंडेल ही परदेशास जातात. एरंडेल तेल बंगाल्यांतून विलायत, आस्त्रिालेया, स्ट्स् सेटलमेंट, चीन, मारशस व केप या देशांस जोतें. खोबरेल बहुतेक मद्रासेहून विलायतेस व युरोपखंडांत जाते; या- चा उपयोग मुख्यत्वेकरून सावण, वासोची तेले करण्याकडे होतो. वर्ग साहवा-कच्चा माल-कोळसा या देशांतील कोळसा परदेशांस जाऊं लागला आहे व तो हल्ली कोलंबो, सिंगापूर, मारिशस व एडन येथे जातो. सन १८९१-९२ साली ४३६४ टन व सन १८९२-९३ साली १५६२० टन कोळसा परदेशी गेला. कापूस-हा विलायत, इटाली, आस्त्रिया, बेलजम, फ्रान्स, जर्मनी, रशिया,