पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होती, ती माफ झाल्यानंतर व्यापाराची वाढ होऊ लागली ; तरी उत्तर व पश्चिमाहेंदुस्थानांतील आगगाड्या सर्व तयार झाल्याने १८८१-८२ नंतर या व्यापाराचे खरे स्वरूप दिसू लागलें. सन १८९१-९२ साली युरोपांतील देशांत पोक बुडाल्याने गव्हांचा व्यापार विशेष वाढला. साधारणपणे दरसाल ७ पासून ८ लक्ष टन गहूं या देशांतून यरोपास जानो. ज्वारी व बाजरी-या धान्यांचा खप सन १८९०-९१-९२ सालांत युरोपांत कार झाला. तिकडे मका, राय, ओट व बटाटे यांपासून दारू काढतात, त्यांची किंमत फार वाढल्याने त्या कामास लावण्यासाठी ज्वारी व बाजरी इकडून ने- ण्यांत आली; परंतु पुढे त्यांचा चांगला उपयोग होत नाही असे ठरले. कोंबडी, बदकें वगरे चा ण्यासाठी तिकड़े ही धान्ये नेतात; परंतु या कामी त्यांचा खप विशेष होण्यासारखा नाही. साखर-निलायत व सिलोन देशांस बहुतेक जाते. या देशांतील साखरेचे व्यापाराचा पूर्ववृत्तांत मोठा चमत्काारेक असून बोध करून घेण्यासारखा आहे. पहिल्याने या दशांतून चांगली गुद्ध खर परदेशास रवाना होत असे. ती बंगा- त्यांतूनच रवाना हाई; कारण, मुंबई व मद्रास या ठिकाणांहून ती पाठावेण्यास ईस्टझाडया कंपनीनें हरकती घालून ठेविल्या होत्या. या देशांतून व पश्चिमे- कडील बेटांतूनही साखर क्लिीयतेस जात असे; त्या वेळी हिंदुस्था- नांतील साखरेवर जास्त आयात जकात होती तीमुळे या व्यापारास हिसका बस ; तसे नसते तर या देशाचा साखरेचा व्यापार वाढला असता. पुढे इंग्लं ढांत व स्काटलंडांत साखर शुद्ध करण्याचे कारखाने झाल्याने इकडून तिकडे गूळ जाऊं लागला व शुद्ध केलेली साखर फार कमी जाऊ लागली. अलीकडे परदेशांतून या देशांत साखर येऊ लागली आहे त्यामुळे या देशांतील गूळ व साखर यांचे उत्पन्नास फार हिसका बसेल असे काही लोकांचे मत आहे. तरी पूर्वीचे मानाने पा तां उसाची लागवड कमी झाली आहे असे दिसत नाही. पुढे युरोपांत बीटपासून साखर काढू लागले, त्यामुळे या देशांतून जी तिकडे शुद्ध कैले । साखर जोत असे ती जाण्याची बंद झाली व उलटे इतर देशांतून जी उसाची साखर युरोप त असे ती हिंदुस्थ नांत येऊ लागली. आतां तर बीटपासून काढलेली साखरही या देशांत पुष्कळ येऊ लागली आहे व एकंदरीत ह्या दोन्ही प्रकारच्या साखरा फार स्वस्त्या झाल्या आहेत. ही पर- देशी साखर इकडे येऊ लागल्याने साखर तयार करण्याचे इकडील कारखाने बसत चालले आहेत. आतां इकडून जितका गुळ परदेशास जातो त्याचे सातपट साखर परदेशांतून इकडे येत. ही साखर इकड येऊ लागल्याने गुळा-