पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३०१) ६८७ ८८ २४८ १४०० ४७३ एडन. १४६४ १८४२ चीन. १११६ मारिशस. १०२६ १४०९ सिलोन-(लंका). १५५८ १५११ आतां हिंदुस्थानांत उत्पन्न होणारा माल परदेशांस जातो त्याबद्दल विचार करावयाचा आहे. ह्या मालाचही आयात मालाप्रमाणेच वर्ग आहेत. वर्ग पहिला-सजीव प्राणी-या वर्गासंबंधाने सांगण्यासारखें विशेष कांहीं नाही. हा व्यापार बहुतेक सिलोनशी व स्टेट्स् सेटलमेंटशी होतो. वर्ग दुसरा-खाण्यापिण्याचे पदार्थ-काफी-काफीची लागवड कोणते भागांत होते तें शेतकीचे भागांत सांगितलेच आहे. ही विलायत, आस्त्रिया, फ्रान्स, जर्मनी, इजिप्त, अरबस्थान, इराण, एशियांतील तुर्कस्थान, वगैरे देशांस जाते. ही बहुतेक मद्रासबंदरांतूनच रवाना होते व कांहीं मुंबई बंदरांतून जाते. तांदूळ-युरोपांत विलायत, माल्टा, फ्रान्स, इजिप्त, जर्मनी वगैरे देशांस; एशियांत सिलोन, स्ट्रेट्स् सेटलमेंट, अरबस्थान व इराण, वगेरे देशांस; आफ्रिकेंत मारिशस, रुंआ, केप कालनी, नेटल व आफ्रिकेचे पूर्व किनाऱ्यावरील देश वगरें- स; अमेरिकेंत वेस्ट इंडीज, दक्षिणअमेरिका, कानडा, युनायटेड स्टेट्स् वगैरे देशांत तांदूळ जातो. त्याचा उपयोग खाण्याकडे व खळ करण्याकडे करतात; व जर्मनी, फ्रान्स, हालंड व इटाली या देशांत त्याची दारू करतात. मुख्यत्वे- करून ब्रह्मदेश व बंगाल प्रांतांतून तांदूळ रवाना होतो. मद्रास, मुंबई व सिंध प्रांतांतूनही तांदूळ बाहेरदेशी जातो, परंतु तितका जात नाही. सन १८६८ सालाचे मानाने हा व्यापार हल्ली तिप्पट वाढला आहे. गहूं-गव्हांचा व्यापार सारखा चालत नाही. ज्या देशांतून तो जातो व ज्या देशांत त्याचा खप होतो, त्या दशांतील पिकावर, कमी किंवा अधिक गहू जाणे अवलंबून असते. त्याचा खप बहुतेक यरोपांतील देशांतच होतो. पाशयांतील देशांत फार थोडा होतो. गहूं मुंबई, सिंध, बंगाल या प्रांतांतील बंदरांतून रवाना होतो. कणीकही परदेशी जाते. काही थोडी विलायतेस व बेलजियम देशास जाते; तरी बहुतक कणीक मारिशस, एडन, अरवस्थान, सिलोन, आफ्रिकेचा पूर्वकि- नारा या देशांस जाते. गव्हांचे व्यापारांत सन १८६८ सालचे मानाने अलीकडे फारच वाढ झाली आहे. सुएझचा कालवा होण्याचे पूर्वी हा व्यापार युरोप खंडाशी होणे शक्य- च नव्हते. सन १८७३ सालापर्यंत गव्हांवर निर्गत जकात टनास पांच रुपये