पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२९८) एकंदर आयात मालांत कापसाचा माल सन १८७३।७४ साली ५७ टक्के होता, तो १८८२।८३ साली ४७ टक्के, व सन १८९३।९४ साली ४३ ३ टक्के झाला ; यावरून इतर मालाचा व्यापार ज्याप्रमाणे वाढत आहे व लोकसंख्या- ही ज्या प्रमाणाने वाढत आहे, त्या प्रमाणाने या व्यापारांत वाढ होत नाही असे दिसते. कापड वगैरे माल ज्या भागांत गिरण्या कमी आहेत त्या भागांत जास्त येतो. हा माल मुंबईस येतो त्यापेक्षां बंगाल्यांत पुष्कळ जास्त जातो. कापड वगेरे माल बहुतेक सर्व विलायतेहूनच येतो. पायमोजे वगैरेसारखें विणकरी काम मात्र सर्वच विलायतेहून येत नाही ; त्यापैकी सुमारे निम्म माल युरोपांतील इतर देशांतून येतो. रेशमो कापड-या कापडाचा व्यापार विशेषसा वाढला नाही. ते विलायते- हून व चिनातून येते व फ्रान्समधून येण्याचे कमी झाले आह. रेशमी भे- सळीचे कापड बहुतेक फ्रान्सांतूनच येते. लोंकरो कापडाचे व्यापाराची वाढही साधारण आहे. शालीशिवाय इतर मालास मागणे फारसें नाही. लोकरी कापड बहुतेक विलायतेहूनच येते. जर्मनी व आस्त्रिया देशांतून गेले १० सालांपासून कांहीं कापड येऊ लागले आहे. इतर माल येतो त्याचे संबंधाने सांगण्यासारखें . विशेष कांही नाही, पोषाखाचें सामान मगजे शिवलेले कपडे, युरापियन लोकांत वापरले जाणारे, हे विलायत, फ्रन्स वगैरे देशांतून येतात. पोवळी इटलीहुन येतात. कागद विलायतेहून व आस्त्रियाहून एकंदरीपैकी सुमारे तीन- चतुर्थांश येतात. आयात मालांत मख्य कापसाचा माल आहे. हा पूर्वीपेक्षां आतां स्वस्ता विकतो. साधारण उपयोगाचे कोणतेही जिनसाचा व्यापार कमी झाला नाही. या जिन सचि व्यापागंत जी वृद्धेि झाली आहे त्यावरून लोकांस माल खरेदी करण्याचे जास्त सामर्थ्य आले आहे, किंवा लोकांस छानछोकीनें रहाण्याची संवय लागली आहे, किंवा त्यांचे रहाण्याचे तन्हें एकंदर सुधारणा झाली आहे असें दिसते. उदाहरणार्थ, रेशमी व उबेची वस्त्रे, किंवा साखर वगेरे जिनस ध्या; हे पूर्वीपेक्षा आतां जास्त खपतात. धातूचा माल जास्त येतो व त्याचा खप मध्यम व कानेष्ठ वर्गाचे लोकांत हातो. मातीची भांडी जाऊन त्यांचेबदली धातूचे भांड्यांचा जास्त उपयोग होतो, यावरून या वर्गाचो स्थिाते सुधारली आहे असे दिसते. खनिज तेलाचे खपांत