पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९५) बीटपासन साखर काढू लागल्यापासून मारिशस वगैरे कडील साखर तेथे खपत नाहीशी झाली, तेव्हा ती हिंदस्थानांत पाठविण्याशिवाय गसंतरच नाहींसें झाले आहे, यामुळे या देशांत साखर फार येते. या देशांतून परदेशांत साखर जाते ती शुद्ध केलेली नसते; तिकडून इकडे येते ती चांगली शुद्ध केलेली असत. चहा---चहा ये तो बहुतेक चिनांतनच येतो. सिलोन बेटाहून अलीकडे चहा येऊ लागला आहे. या चहापकी बराच इराण व अफगाणिस्थान या दे- शांस जातो. चिनांतील इकडे येणारा चहा हलका असतो व कमी किमतीस विकतो. सिलोन बेटांतील चहा चांगला असतो व तो मुंबईस जास्त येतो; कारण या प्रांतांत त्या चहास उत्तरहिंदुस्थानांतील चहाबरोबर किमतीसंबंधाने चढाओढ करण्यास सांपडते. प्रोव्हिजन्स--खाण्याचे पदार्थ--या सदरांत लोणी, मासे, मांस, मिठाया, चीझ, लोणची, मुरांबे, वाळावलेली व मसाला घातलेली फळे, खजूर, पीठ, तूप, वगैरे पदार्थ येतात. मध्यंतरी मिठावरील जकात वाढविण्यांत आल्यावर काही दिवस खार माले फार येऊ लागले होते; त्यांजवर जकात बसविण्यात आल्यावर ते आतां कमी येऊ लागले आहेत. या वर्गातील बराच माल विलायतहन युरो- पिअन लोकांसाठी येतो. इराणचे अखाताने व मकाण किना-यावरून मुंबई व सिंध प्रांतांत तूप येते. वर्ग तिसरा--धातू व धातूचे पदार्थ-हार्डवेअर व कटलरी ( चाकू, काच्या व- गरे धातूचे सामान ). हा माल बहुतेक विलायतेहूनच येतो तरी अलीकडे ज- मनी, ऑस्त्रिया व बेल्जम ह्या देशांतून हा माल बरोच येऊ लागला आहे. सन १८५३-९४ साली या देशांतून हो माल एकंदरीपैकी सुमारे एकपचमांश या साली शिवण्याची यंते किंमत रु. ४०४५०० ची आली. लोखंड व पोलाद--हें विलायतेहून मुख्यत्वे या तरी आतां बेलजन व जर्मनी- हूनही बरेंच येऊ लागले आहे. पूर्वीपेक्षां लोखंडाचे बदली पो आदाचा उप- योग जास्त होऊ लागला आहे. किलो यतेहून येणारा माल चांगला परंतु महाग असतो व जर्मनी व बेल्जम येथून येणारा माल हलका परंतु खस्ता असतो, यामुळे हा माल जास्त खपूं लागलो आहे. तांबे-लोखंडाचे खालोखाल महत्वाची धातू तांबे आहे. ते चीन, विलायत, आस्त्रेलिया वगैरे देशांतून येते. आला.