पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुष्कळ वाढेल. ळसा वगैरे. (२८६) सामान, कोळसा वगैरे. सूत ( २२१९), कापूस ( १०९३८ ) व पोती हे जिन्नस जाणारे मालांत महत्वाचे आहेत. (हे आंकडे मालाचे किंमतीचे असून हजार रुपयांचे १८९३.९४ चे आहेत.) या देशांतून येणारा माल पूर्वी चीन देशाचे बंदरांतून येत असे, आतां त्या देशाशी आगबोटीने परस्पर दळणवळण टाटा कंपनीचे परिश्रमाने सुरू झाले आहे; या कंपनीस प्रतिस्पर्धी पेनिनशुलर कंपनी आहे; तिचे बरोबर चढाओढी. त टाटा कंपनी जर टिकली तर हिंदुस्थानाचा जपानाशी व्यापार जपान देशांत गिरण्या सुरू झाल्याने इकडून तिकडे सूत व कापड फार थोडे जाते. पुढे तिकडील कापड चीन वगैरे देशांत खपूं लागल्याने या देशाचा माल तिकडे खपण्यास अडथळा होईल अशी भीति आहे. आतां तयार मालाऐवजी हिंदुस्थानांतून जपानांत कापूस पुष्कळ जाऊ लागला आहे. आस्ट्रलिया-येणारा माल:-घोडे ( : ४२३ ), तांवें (५०६), को- जाणारा माल:-पोता (६३१६), एरंडेल ( ५७२ ), चहा, तांदूळ वगैरे. हे आंकडे मालाचे किमतीचे असून हजार रुपयांचे सन १८९३-९४चे आहेत. या देशाचा हिंदुस्थानाशी व्यापार पुष्कळ वाटेल असे काही दिवसांपूर्वी वाट- त होते, परंतु तसे काही घडून आले नाही. हा देश विशेष प्रकाराने कोरागिरी- चा माल तयार करूं लागल्याशिवाय व येणारे जाणारे मालावर जकाती त्या देशांत घेतात त्या बंद झाल्याशिवाय व्यापार वाढण्याची आशा कमी आहे. मारिशस-या बेटांतून साखर व गूळ हा माल मुख्यत्वेकरून येतो. सन १८९३-९४ साली साखर १७३२१ हजार रुपयांची आली. जणारा माल:- तांदूळ (६८३०), हरभरे व डाळ, इतर डाळी, तेल व पेंड, सोरा, पोती, कणीक वगैरे. (हे आंकडे मालाचे किंमतीचे असून हजार रुपयांचे १८९३-९४ चे आहेत.) जाणारे मालांत मुख्य तांदूळच आहेत. या बेटाबरोबरील व्यापार सारखा चालत नाहीं; तो मुख्यत्वेकरून एकच जिनसाचा असलेमुळे त्यास वारंवार झोंके बसतात. या बेटांतून इकडे साखर फार येऊ लागली, ती इकडे तिचा खप वाढला ह्मणून येऊ लागली असें नाहीं; युरोपांत साखर होऊ लागल्याने या वेटांतील साखरेचा तिकडे खप कमी झाला, तेव्हां तिचा कोठे तरी खप करणे जरूर झाले ह्मणून या देशास येऊ लागली.