पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ge (२८७) मोझांबिकहून मुख्यत्वेकरून हस्तिदंतच येतो व परदेशांतून आलेले कापड तिकडे जातें. झांझिवार.-येणारा माल:-लवंगा (१५०८), हस्तिदंत, खोबरें, वगैरे. जाणारा माल.-परदेशीय कापड ( २३९२), देशी कापड ( २०७०), तां- दूळ ( ११०२), परदेशीय साखर, कणीक, तूप वगैरे. (हे आंकडे मालाचे किंमतीचे असून हजार रुपयांचे १८९३-९४ चे आहेत.) परदेशीय कापड व साखर हे पदार्थ पहिल्यापेक्षां आतां कमी जातात; बा- कीचा व्यापार चांगला चालला आहे. केप आफ गुड होप-हिंदुस्थानचा या देशाबरोबर व्यापार फार थोडा होतो. येणारे पदार्थांत लोखंड व तांबें हेच पदार्थ महत्वाचे आहेत. जाणारे मालांत तांदूळ (५४९), पाती (१४०९) व सागवान हे पदार्थ मुख्य आहेत. (हे आंकडे मालाचे किंमतीचे असून हजार रुपयांचे १८९३-९४ चे आहेत.) ईजिप्त -आयात माल:-पोषाखाचें सामान, तंबाखूचा तयार माल, कापूस वगैरे. जाणारा माल:-तांदूळ (१८९२४), गहुं ( ७२५०), गळि ताची धान्यें नीळ (३३६३); साखर वगेरे. ( हे आंकडे मालाचे किंमतचे असून हजार रुपयांचे १८९३-९४ बद्दल आहेत.) या देशास पुष्कळ माल जातो तो नांवाचा मात्र त्या देशांस जातो ; खरोखर तो युरोपांतील देशांसाठीच जातो. असे होण्याचे कारण तांदूळ, गहूं हे तिकडे जातात ते पूर्वी मागणे येऊन त्याप्रमाणे पाठविलेले नसतात; ते इजिप्तांत गेल्यावर मागणे येईल त्या मानानें कोठे पाठविण्याचे ते ठरते. या देशाचे उपयोगासाठी ह्मणजे पोती व नीळ हे पदार्थ जातात. आयात य निर्गत व्यापार. -आतां ज्या मालासंबंधाने व्यापार होतो याचा विचार करण्याचा आहे. या मालाचे सरकारांनी सात वर्ग केले आहेत. (१) जिवंत प्राणी ( जनावरें ), (२) खाण्याचे पदार्थ, (३) धातू व धा- तूंचे जिन्नस, (४) रसायनद्रव्ये, औषधे, अमली पदार्थ व रंगाचे जिन्नस, (५) तेले, (६) कच्चा माल, (७) पूर्णपणे व अंशतः तयार केलेले जिन्नस. व्यापाराचे सर्व जिनसांची नांवनिशी येथे देणे शक्य नाही. काही महत्वाचे जिनसांची नांवनिशी व त्यांची किंमत ही मात्र येथे देतो.. व्यापारांत जिन्नसवार वाढ कशी झाली आहे हे दाखविण्यासाठी, सन १८७५-७६, १८८१-८२, १८९१-९२ व १८९३-९४ सालांचे आंकडे दिले आहेत. या