पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(15) आतां ब्रह्मदेशाबद्दल सांगण्याचे राहिले. ब्रह्मदेशाचा खालचा भाग पेगूचे दोन्ही बाजूंचा सन १८२६ साली इंग्रजी राज्यांत सामील झाला. वरचा ब्रह्मदेश १८८६ सालापर्यंत तेथील राजाचेच ताव्यांत होता. त्या राजानें खालच्या ब्रह्म- देशावर स्वारी करण्याचा बेत केला व याची वर्तणूकही अन्यायाची होती, ह्मणून तो प्रांत खालसा करण्यांत आला. तो प्रांत सन १८८५ चे अक्टोबर म- हिन्यांत इंग्लिशांचे सैन्याचे ताब्यांत आला व पुढील जानेवारीत तो कायम खालसा झाला. वरच्यापेक्षा खालचा ब्रह्मदेश फार सुपीक आहे व तेथून पुष्कळ तांदूळ परदेशास जातो. वरच्या ब्रह्मदेशास चांगली जमीन पुष्कळ आहे, परंतु पर्जन्याची कमताई व अनिश्चितपणा, मजूरदारांचा अभाव ह्या त्या प्रांताच्या उ- णीवी आहेत. या प्रांताचा कारभार चीफ कमिशनर पहातो व त्याचें ठाणे रंगून असते. हा थोडका वर्णनात्मक भाग पुढील भागांस उपोद्घातादाखल दिलेला आहे. पुढे प्रांताप्रांतांतील राजव्यवस्थेचें जें वर्णन करण्यांत येईल ते समजण्यास हा उपोद्घात उपयोगी होईल. “ भाग दुसरा. राज्यव्यवस्था. मागलि भागांत देशाचा विस्तार व त्यांतील प्रांतांचें सामान्य वर्णन दिले आतां इंग्रजांचे अमलांत असलेल्या प्रांतांची राज्यव्यवस्था कोणत्या पद्धतविर चालते त्याचे वर्णन करावयाचे आहे. हिंदुस्थानांत सर्वांत श्रेष्ठ अधिकारी व्हाइसराय ह्मणजे बादशाहिणीचे प्रति- निधि हे होत. सर्व राज्यकारभार गव्हरनर-जनरल-इन् कौन्सिल " असे नांवानें चालतो, व त्यांचे नियंतृत्व हिंदुस्थानचे स्टेटसेक्रेटरी यांकडे आहे. हिंदुस्थानचे सर्व प्रांतांवर हिंदुस्थानसरकारचा अधिकार आहे, तरी तो सर्व ठिकाणी एकाच रीतीनें चालावण्यांत येत नाही. काही प्रांत प्रत्यक्ष त्यांचे हाताखाली आहेत, व कांहीं प्रांतांवर गव्हरनर, लेफ्टनेंट गव्हरनर, व कमिशनर असे अंमलदार आहेत. मद्रास व मुंबई इलाख्यांचे स्थानिक सरकारांस इतर प्रांतांतील स्थानिक सरकारांपेक्षा जास्त स्वातंत्र्य आहे. त्या दोन इलाख्यांत मुख्य अधिकारी गव्हरनर असून त्यांची नेमणूक गव्हरनर-जनरल यांचेकडून होत नाही, ती खुद्द राजा किंवा राणी यांकडून होते; तरी ते गव्हरनर- -जनरलचे