पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३) तीसाठी जी फौज देण्याची तिचे खर्चासाठी तोडून दिला. कारभाराचा खर्च व सैन्याचा खर्च हे वजा जाऊन शिल्लक उरेल ती निजामास देण्यात येते. हा प्रांत फार सुपीक आहे. ह्या प्रांतांतील हवा-पाणी व भूमिभाग व लोकस्थिति ह्यांचें साम्य त्याच पूर्व व पश्चिमेस असलेल्या महाराष्ट्र प्रांतांशी आहे. दुसऱ्या प्रांतांतून ह्याही प्रांतांत पुष्कळ लोक येऊन राहिले आहेत, परंतु यासंबंधाने आतां परि- पूर्ति झालेली आहे. या प्रांतांत गहूं, कापूस व गळिताची धान्ये वगैरे निर्गत होणाऱ्या मालाचेच उत्पन्न फार होते. या प्रांताचा कारभार कमिशनर पहातो व तो हैदराबादचे रेसिडेंटाचे हाता- खाली आहे. कुर्ग-प्रांत सन १८३४ साली तेथील राजाने आपल्या मांडलिकांवर फार जु- लूम केल्या कारणाने खालसा करण्यांत आला. हा प्रांत झैसूरचे पश्चिमेस आहे व कोफी वगैरे विदेशीय वृक्षवर्गाचे संवर्धनास योग्य आहे. युरोपियन व एतद्देशीय लागवड करणारे लोक तेथे लागवडीसाठी जाऊन राहिले आहेत व मजूरदार लोकांचाही गुजारा तेथे चांगला चालतो. ह्या प्रांताचा कारभार कामिशनर पाह- तो व तो हँसूरचे रोसडेंटाचे हाताखाली आहे. बंगलोर शहर सन १८८६ साली झैसूरचे राजास त्याचे संस्थान परत देतांना ठेऊन घेतले व तें इंग्रजी मुलखांत सामील करण्यांत आले आहे. या शहरांत लोकवस्ती सुमारे एक लक्ष आहे. ब्रिटिश बलुचिस्तान-संबंधाने जास्त उल्लेख पुढे करण्यांत येईल. वरील पत्रकांत क्वेटा व लोरेलाई क्यांटोन्मेंटातलि व त्या बाजूचे आगगाडीचे रस्त्या- वरील लोकांची संख्या दिली आहे. या प्रांताचे चीफ कमिशनरचे ताब्यांत याशिवाय जो प्रांत आहे त्यांत लोकवस्ती १४५२१७ आहे. अंदमान व निकोबार-यांचे संबंधाने सांगण्यासारखे काही नाही. पोर्ट ब्लेर हे हद्दपार केलेल्या कैद्यांचे ठिकाण १८५८ साली ठरविण्यात आले व हल्ली त्यासंबं- धाने त्यांत वस्ती १५६०९ आहे. बाकीचे त्या वेटाचे भागांत रानटी लोक रहात आहेत. लकदीव व मिनिकोई वेटें मिळून त्यांचे दोन भाग केले आहेत. उत्तरभाग दक्षिणकानारा प्रांतांत मोडतो व त्या प्रांताचे आधिकारी त्या बेटाची व्यवस्था पहातात व बाकीचा भाग मलवारचा भाग असे समजतात. या बेटांची लोकसंख्या १४ किंवा १५ हजार आहे. ते मासे मारणे व काथ्याची सोलें वगैरे जिन्नस करणे, ही कामे करतात. या बेटांची देखरेख हिंदुस्थानांतून सरकारी अंमल- दार जाऊन करतात ; बाकी त्या रहिवाशांस खतंत्रता असल्यासारखीच आहे व विशेष काही झाले तर तेच येऊन सरकारी अंमलदारांस कळवितात.