पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तूप, धान्य, वगैरे येतात. सन १८९३-९४ साली घोडे १०८४ हजार रुपयांचे आले. या देशांस माल जातो यांतील मुख्य जिनसांची नांवनिशी व १८९३-९४ सालांत किती किंमतीचा माल गेला त्याची किंमतही देतो. किंमतीचे आंकडे त्या त्या जिनसाचे पुढे असून हजार रुपयांचे आहेत. निर्गत होणारा माल:-परकीय कापड (१०१७), परकीय साखर (४३७), काफी (५६८), नीळ (११०१), पोती (१०१९), देशी सूत ( २७९). या- शिवाय देशी कापड, मिरी, चहा वगैरे. पोत्याचा व्यापार वाढत आहे. चहा व सूत ही पूर्वीपेक्षा जास्त जाऊ लागली आहेत. साखर, काफी, नीळ वगैरेंचें मान कमी आहे, देशी व परदेशी कापड व मिरी ही पूर्वीप्रमाणेच जातात. इराण-आयात माल:-कापूस, मोती, खजूर, फळे, लोंकर, सुगंधी सा- मान, हिंग, रेशीम हा व्यापार वाढत नाही. १८९३-९४ साली घोडे ३४९ हजार रुपयांचे आले. जाणारा माल:-परकीय कापसाचे कापड (५६८४), देशी कापड ( २५२), परकीय सूत (३५१), देशी सूत (२११), नीळ (१४१०) , देशी चहा (१५९१), परकीय चहा (३२१६), परकीय साखर (१३०१), देशी काफी (३६१), तांदूळ (१०३२), याशिवाय परकीय तांबें, मिरी वगैरे माल जातो. हा व्यापार साधारण वाढला आहे. (हे आंकडे मालाचे किमतीचे असून हजार रुपयांचे १८९३-९४ सालाबद्दल आहेत.) या देशांतून येणारे मालांत महत्वाचा माल मोती व खजूर हा आहे. या देशांतून कापूस येतो, तो इकडील कापस महाग झाला ह्मणजे मुंबईतील गिर- ण्यांसाठी आणण्यांत येतो. हिंदुस्थानांतून जाणारे मालांत महत्वाचा माल ह्मणजे तांदूळ व नीळ. इकडील सूत व कापड तिकडे फारसें खपत नाही. या देशांतून चिनांत अफू जाते ती मुंबई बंदरांत येऊन पी. आणि ओ. कंपनीचे आगबोटीतून पुढे जाते. चीन-चीन देशाशी व्यापार मुख्यत्वे अफूचाच आहे. त्या देशांतून या देशास इकडून जाणारे मालाचे किंमतीचा माल येत नाही. ही जी या देशाची चीन देशाकडे बाकी फिरते तिचे मोबदला चीन देश विलायतेस माल पाठवितो व त्याने या देशाचे बाकीची फेड होते. सन १८७५-७६ सालानंतर मुंबईहून कापसाचे सूत व कापूस व कलकत्याहून पोती तिकडे जाऊ लागली; तेव्हां- पासून म्यांचेस्टर येथील माल तिकडे कमी खपूं लागला. हा व्यापार कसा वाढत गेला ते पुढील कोष्टकावरून दिसून येईल.