पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लक्ष (२८२) परंतु ते काढण्याचा उद्योग विशेषसा झालेला नाही ; परंतु आतां तिकडे लागत आहे. या देशाचा युनायटेड स्टेटशी परस्पर व्यापार चालतो. माल न्यूयार्क येथे पाठविण्यासाठी गलबतांतून लिव्हरपूल व ग्लासगो येथे जातो व तेथून दुसरे गलबतांत भरून पुढे अमेरिकेत जातो. त्या देशाशी असा परभारा व्यापार सुरू झाल्यापासून निर्गत व्यापारास वाढ आहे. अरवस्थान-येणारा माल :-खजूर, मोती, मीठ, मासे, वगैरे. जाणारा माल:-परकीय देशांतील कापड ( १४५९ ), देशकापड ( ५४०), परकीय सूत (८१), देशीसूत ( १८१), परकीय साखर ( ४५९), परकीय काफी, देशीकानी ( ३५३), तांदूळ (३६०१), गहूं ( ३४७ ), कणीक, ज्वारी, देशी साखर वगैरे. ( हे आंकडे मालाचे किंमतीचे असून, हजार रुपयांचे १८९३-९४ चे आहेत). या देशास हिंदुस्थानांतून काफी जाणे ह्मगजे सकृद्दर्शनी चमत्कारिक दिसते; कारण ती या देशांत फार पिकते व ती तेथूनच इतर देशांत फार जात. इकडील काफी जाते ती तेथील उंची मालांत भेसळ करण्यासाठी व त्या देशांतील चांगला माल गेल्याने देशांतील खपास कमी पुरवठा होतो तो भरून काढण्या- साठी जाते. एडन-हें वंदर त्याचे भोंवतालचे भागांशी होणारे व्यापाराची उतार पेठ आहे. सन १८८५-८६ सालापासून एक इटालियन कंपनी एडन येथे मीठ तयार करून हिंदुस्थानांत पाठवीत असते. येणारा माल:---मीठ (७९० ) हस्तिदंत, काफी वगेरे. जाणारा माल:---युरोपीय कापड ( ९२३ ), देशी कापड देशी सूत (६८४), तांदूळ ( १२१७), ज्वारी, गव्हांची कणीक, तंबाखू, सुंठ, गहूं, परदेशी साखर वगैरे. हे आंकडे मालाचे किंमतीचे असून हजार रुपयांचे १८९३-९४ चे आहेत.) गेले दहा सालांचे मानाने पाहतां, येणारे मालांत हस्तिदंत कमी येतो, काफी, मीठ जास्त येतात. जाणारे मालांत कापड, तांदळ, तंबाखू, सुंठ हे पदार्थ पूर्वी- प्रमाणेच जातात, गहूं व देशी सूत ही कमी जातात. ज्वारीचा व्यापार कमी जास्ती होतो. कणीक जास्त जाऊ लागली आहे. एशियांतील तुर्कस्थान-या देशाचा व्यापार बसोरा बंदराशी मुख्यत्वे करून होतो. आयात मालांत मुख्य ह्मणजे खजूर व घोडे. त्यांचे खाली गहूं, ( १७५७),