पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२८) सूत व स्टेशनरी येण्याचे बहुतेक बंद झाले आहे. जाणारे मालांत कापूस व गहू हा माल नेहमी सारखा जात नाही. गळिताचे धान्यांत मात्र वाढ आहे. एक- दरीत आयात मालांत वाढ आहे तशी निर्गत मालांत नाही. या देशांत अप्रतिहत व्यापाराची तत्वे चालू आहेत, व लोक कुशल व उद्योगी आहेत, तेव्हां हिंदुस्थानाशी या दशाचा व्यापार वाढण्यास सोईचे आहे. आंटवर्प बंदर हे त्या देशास व युरोपाचे उत्तरभागांस साल परविण्यास मोठे सोईचे ठिकाण आहे. रशिया-येणारे मालांत महत्वाचा माल झणजे एशेयांतील रशियांतून केरोसीन तेल येतें तें आहे. हे तेल १८८५।८६ साली पहिल्याने येऊ लागले. त्या साली हे तेल ६७० हजार रुपयांचे १५७७ हजार ग्यालन आले. त्यांत वाढ होत जाऊन सन १८९१।९२ साली ११२९१ हजार व १८९३।९४ साली १२६२५ हजार रुपयांचं आलें. काळ्या समुद्रांतून युरोपीय राशियांत कापूस (४९८3 ) नीळ (५९१), व गळिताची धान्ये, तांदूळ वगैरे जिन्नस जातात. आयात व निर्गत व्यापारांत गेले पांच सालांत वाढ झाली आहे. ( हे आंकडे मालाचे किमाचे असून हजार रुपयांचे १८९३-९४चे आहेत). युनायटेड स्टेट्स-येणारा माल :-कोरे कापड (५४५), केरोसीन तेल (१८३१८ ), तंबाखू ( ३९८ ), घड्याळे ( १८४ ) वगैरे. जाणारा माल : जूट (ताग) (५६७६), जवस (८३३), नीळ (४३७७ ), कची कातडों ( ५:८४), कमावलेली कातडी (४५३८ ), चपडी लाख (२०५७), पोती ( ३११४), पोत्यांचे कापड (४०३६ ), कात (८५६), चहा ( ७० ), सोरा (५४), वगैरे. (हे आंकडे मालाचे किंमतीचे असून हजार रुपयांचे १८९३-९४ चे आहेत ). गेले दहा सालांत केरोसीन तेल येण्याचे संबंधाने फार वाढ झाली आहे. कोरे कापडाचा व्यापार सारखा चालत नाही. जाणारे मालांत ताग, लाख, सोरा, कच्ची कातडी व कमावलेली कातडी, यांचा व्यापार पूर्वीप्रमाणेच आहे. दुसरी कातडी, पोती व पोत्यांचे कापड व चहा यांत वाढ आहे. जवस जा- ण्याचे फारच कमी झाले आहे ; व तसे होण्यास कारण त्या देशांत सरकारांनी सवलती देऊन तो पिकविण्यास उत्तेजन दिले आहे हे आहे. केरोसीन तेल सन १८७५-७६ साली ५३६ हजार ग्यालन आले; सन १८९३-९४ साली ४९२२६ हजार ग्यालन आले; यावरून हा व्यापार किती वाढला आहे त्याची कल्पना होईल. हिंदुस्थानांत व ब्रह्मदेशांत हे तेल सांपडतें