पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रंग, वगैरे. माल फार येतो. व्यापार ट्रिस्टी, व्हेनिस्, अंटवर्प बंदरांतून व विलायतेचे 'द्वारे होतो. हालंड-या देशांतून माल येतो तो सर्व याच देशांतील नसतो. जर्मनी वगैरे देशांतील माल हालंड देशाचे बंदरांतुन या देशास येतो. येणारा माल:-रंगित सुती कापड, रंगित लोकरी कापड, मेणवल्या, तंबाखू, दारू, खेळणों, रंग वगैरे. जाणारा माल:—गहूं, जवस व मोहन्या. आस्त्रिया-येणारा माल-कापसाचे सूत (५६९), पोषाखाचें सामान, लोकरीचे कापड (९८२), हार्डवेअर (५५६), कागद (१२९४), स्टेशनरी सामान, कांचेचे मणी, कांचेचें सामान, भेसळीचे रेशमी कापड, आनिलाइन जाणारा माल:-कापूस (१७३९९), नीळ (४२२३), जूट (ताग) (३१६४), कातडी (१४८८) वगैरे. (हे आंकडे मालाचे किमतीचे असून हजार रुपयांचे १८९३-९४चे आहेत). या देशांतन माल येण्याचे फार झपाट्याने वाढत आहे; गेले पांच सालांतच त्याची दुप्पट वाढ झाली आहे. सूत येण्याचे मात्र कमी झाले आहे. दहा वर्षा- चे पूर्वी या देशांतून येणारे मालांत कागद व सूत हेच जिन्नस महत्वाने होते. इतर जिन्नस येण्याचे अलीकडेसच चालू झाले आहे. जमनीप्रमाणच या देशांतूनही नकली स्वस्त माल येतो व त्याची वाढ आहे. आयात मालांत वाढ झाली आहे तशी निर्गत मालांत झाली नाही. आस्ट्रो-हंगेरियन कंपनीच्या आगबोटी त्या देशांतून या देशास परभाऱ्या येऊ लागल्याने व्यापार वाढत चालला आहे. बेल्जियम-येणारा माल:-लोखंड व लोखंडी सामान (६३३४), पोलाद (२७७७), मेणबत्या (४३७ ), हार्डवेअर-चाकू, काव्या वगैरे धातूचा माल (८१४), कांच व कांचेचें सामान ( १३७५), आनिलाइन रंग ( ३२६०), तांचे (८४६), आगकाड्या (४११), मातीचे जिन्नस ( ५२०), सूत वगेरे. जाणारा मालः -कापूस ( २२७९२), गहूं (५८९३), गळिताची धान्ये (२५५११). (हे आंकडे मालाचे किंमतीचे असून हजार रुपयांचे १८९३-९४चे आहेत). पूर्वी स्टेशनरी सामान, सूत व कांच हाच माल विशेष येत असे सन १८८३। ४ सालापासून इतर माल येऊ लागला व त्याची वाढही चांगली झाली आहे.