पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तील असतात. फ्रान्स---येणारा माल:-पोषाखाचे मामान (२३९७ ), रेशमी कापड, ( १३२३), भेसळीचे रेशमी कापड ( १७८२), ब्रांडी व इतर दारू (१५०७), घड्याळे, केशर, कांचेचे मणी, रंगित कापड व दुसरा किरकोळ माल. जाणारा माल :-कापूस ( १३४७१), गहूं (८५६५), नीळ ( ३९२५), गळिताची धान्ये (५८५४१), काफी ( ७३१८), रेशीम (२३४७ ), कातडी (१७७५), मिरी वगैरे. (हे मालाचे किमतीचे आंकडे हजार रुपयांच १८९३-९४ सालाचे आहेत). गेले 10 सालांत आयात मालापैकी पोषाखाचे सामानांत व रेशमाचे भेसळीचे कापडांत पुष्कळ वाढ झाली आहे ; बाकीचे मालांत विशेष कमी जास्ती झालें नाही. निर्गत मालांत गळिताची धान्ये, रेशीम व नाळ या पदार्थीसंवधाने वाढ आहे व वाकीचे मालांत कमी जास्ती कांही झालेले नाही. या देशांतून माल येतो तो बहुतेक यरोपिअन लोकांचे उपयोगाचाच येतो. निर्गत मालापेक्षां येणारा माल कमी दिसतो, परंतु खरें हाटले तर तसे नाही; या देशांतून परस्पर माल येतो त्याचेशिवाय पुष्कळ माल इंग्लंडांत जाऊन तथून या देशास रवाना होतो. या देशांतून घड्या येतात तो स्वित्झरलंडां- जर्मनी येणारा माल: -लोकरी कपडा व लोकरीचा इतर माल ( २४४७), मीठ ( ९५९), साखर ( २७६१), चांकू, काच्या वगेरे धातूचा माल व हार्ड- वेअर ( १३९२ ), आगपेट्या (५०५), कांचेचें सामान ( ८०३), दारू ( २९९ ), पोषाखाचें सामान (८०७), आनिलाइन रंग ( ४०५ , पोलाद (५५९), लोखंड ( ७१६), कापसाचे कापड ( ६५७ ) व इतर माल. जाणारा माल :-कापूस ( २८६६०), जूट (ताग) (११६४२), गळि- ताची धान्ये (१५५७३), कातडों ( ६८०४), नीळ : ४७५२ ), तांदूळ (१७८०), गहूं ( १५२ ), वगैरे. (आंकडे मालाचे किमतीचे असून हजार रुपयांचे १८९३-९४चे आहेत.) लोकरी कपडा, व आगकाड्या यांचे येण्याचे मान पूर्वीप्रमाणेच आहे ; बा- कीचे जिनसांत वाढ आहे. दारू मात्र काही कमी येते. तांदूळ व कापूस हे गेले १० वर्षांचे पूर्वी जात होते त्यापेक्षा कमी जातात. वाकीचे मालांत वाढ आहे. गहूं व गळिताची धान्ये जास्त जातात, परंतु तो व्यापार नेहमीसारखा चालत नाही, कमी जास्त होत असतो. या देशांतून माल येतो त्यांत हलका व विलायतेचे मालासारखा नकली