पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७८) कडून जूटचा इकडे तयार झालेला मालही तिकडे जाऊ लागला आहे. हा सन ८९३-९४ साली ५९८२ हजार रुपयांचा गेला. गेले १० वर्षांचें मान पाहतां, आयात मालापैकी कोरे कापड व सूत यांचे मान थोडे उतरले आहे, व बाकीचे मालांत सांगण्यासारखा फरक झाला नाही. निर्गत मालांत कापूस जाण्याचे फारच कमी झाले आहे. तांदूळ व नीळ हे जिन्नस थोडे कमी जातात. बाकीचे जिनसांत वाढच आहे. कापूस कमी जा- ण्याचे कारण असे आहे की आतां जाडे कापड या देशांत निघू लागले आहे, व तें कापड विलायतेस निघेनासे झाले आहे; या देशांतून कापूस जाई तोही जाडे कापडास उपयोगी पडण्यासारखाच जात असे, तेव्हां जाडे कापड निघ- ण्याचे बंद झाल्याने कापूसही जाण्याचे बंद झाले. तो कापूस आतां तिकडे न जातां इकडील गिरण्यांतच खपतो. युरोपांतील इतर देशांस कापूस विलायतेचे मार्फत जात असे तो आतां परस्पर जाऊं लागला आहे, हेही तो विलायतेस कमी जाण्याचे एक कारण आहे. इटली.-या देशाशी ज्या जिनसांचा व्यापार होतो त्यांपैकी मुख्य येथे देतो. सन १८९३-९४ साली किती व्यापार झाला ते दाखविण्यासाठी मालाचे किंमतीचे आंकडे मालाचे नांवापुढे दिले आहेत. हे आंकडे हजाराचे आहेत. येणारे जिन्नस :-पोवळी (१५९३), पांढरे धुवट कपडे, रांगत कपडे, कां- वेचे मणी, रेशमी कापड, पोषाखाचे जिन्नस, संगमरवरी दगड, घड्याळे वगैरे. जाणारे जिन्नस :-कापूस ( १८१८६), गहूं ( २०३१), गळिताची धान्ये ( ५७७४ ), रेशीम (८७८), ताग ( २६४४ ), नीळ ( ९५३ ), कातडी गेले १० वर्षांत पोंवळी व रेशमी कापड येण्याचे मान कमी झाले आहे ; पांढरे धुवट कापड, पोषाखाचें सामान, सर्गमरवरी दगड पूर्वीप्रमाणेच येत आहेत; राँगत कापड, कांचेचे मणी व घड्याळें ही पूर्वीपेक्षा जास्त येतात. जाणारे मालांत कापूस, नाळ, कातडी ही पूर्वीप्रमाणेच जातात; गाळेताची धान्ये, गहूं व जूट ( ताग) ही जास्त जातात ; रेशमि कमी जाते. या देशांतून जो माल येतो त्यांत युरोपिअन लोकांचे उपयोगाचाच विशेष येतो. तो सर्वच त्या देशांत झालेला येत नाही, त्यांत कांहीं जर्मनीचे दक्षिण भागांतीलही येतो. या देशाचा हिंदुस्थानाशी व्यापार विशेषसा वाढला नाही, कारण तिकडून येणारा माल नेहमींचे गरजांचा नसल्यामुळे त्याचा खप इकडे सुबत्ता किंवा दुर्भिक्ष असेल त्या मानाने होतो व येणारे व जाणारे मालावर त्या (३३५६) वगैरे. देशांत दस्तुरी घेण्यांत येते.