पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७७) ४८ कालवा झाल्यापासून या व्यापाराची दिशा पालटली, व व्यापार पूर्वीचे मार्गाने फिरून होऊ लागला. विलायतेशी होणारे व्यापाराची वाढ गेले वीस वर्षांत कशी झाली तें खालील आंकड्यावरून दिसेल. आंकडे कोटि रुपयांचे आहेत. १८७१-७२ १८८१-८२ १८९१-९२ १८९३-९४ आयात माल- ३२ ५२ निर्गत माल ३३ ३४ ३४ हिंदुस्थान देशास कापड, धातू, यंत्रे, कोळसा, वगैरे जो माल लागतो तो पुर- विण्याचे सामर्थ्य इंग्लंड देशासच आहे, तो माल पुरवितां येण्यासारखें सामर्थ्य इतर देशांस नाहीं; अशी स्थिति आहे तोपर्यंत येणारे मालासंबंधाने विलाय- तेचा नंबर वर राहणे खाभाविक आहे. आतां इतर युरोपीय देशही हा माल पुरविण्याचा काही प्रयत्न करू लागले आहेत, तरी अशा कामांत विलायतेशी प्रतिस्पर्धा करण्यासारखा देश केवळ हिंदुस्थान हा आहे. या देशांत व्यापारास उपयोगी खनिज व उद्भिज जिनसांची समृद्धि आहे, व त्याचा उपयोग करून घेण्याकडेही लक्ष जास्त लागत चालले आहे. दगडी कोळसा व लोखंड काढ- ण्याचे कारखाने वाढत आहेत, कापसाचे व लोकरीचें सूत काढण्याचे व कापड विणण्याचे कारखाने पुष्कळ होत आहेत; अशा प्रकाराने चढते काळाची कला दिसू लागली आहे. विलायतेहून या देशास माल येतो व इकडून तिकडे जातो त्यापैकी काही महत्वाचे जिनेसांची नांवे येथे देतो. त्यांचे पुढे कंसांत सन १८९३-९४ साली माल किती आला त्याची किंमत दिली आहे; ते आंकडे हजार रुपयांचे आहत. आयात माल-कोरे कापड (१५९३२९), धुवट कापड ( ५४०४१), रंगित कापड ( ६६९४३), सूत ( ३०१४५), लोकरीचे कपडे (१०१०११, दारू (८९८१ ), हार्डवेअर-चाकू, कान्या वगैरे धातूचे सामान--( ९९०७), यंत्रे वगैरे ( २४७५०), रेशमी कापड ( ५८७५), तांब्याचे पत्रे (१५४६८), दगडी कोळसा ( ९४१६). यांशिवाय मीठ, पोषाखाचें सामान वगैरे माल येतो. निर्गत माल-कापूस ( १३०२७), गहूं ( २५६३२ ), गळिताची धान्ये (३६२०१), तांदूळ (१८४९९ :, चहा (३११४४ ), जूट--ताग (५५६५०), नीळ ( १५७६० ), कातडी (५३८४ ), देशी लोंकर (१०४३६ ), परकी लोकर (६१०६), काफी ( ९९५८), सोरा ( १३०८). अलीकडे कलकच्या-