पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हे आगगाडीचे एक मोठे ठिकाण झाले आहे. (१२) परंतु लोकव्यवहारांत राजशार्दूल रणजितसिंह याचे राज्यमर्यादेतील सर्व प्रांताचा त्या नांवांत समावेश करण्यांत येतो. या प्रांताचा बहुतेक भाग १८४९ साली सर करण्यांत आला, परंतु सतलजचे अलीकडील भाग १८०८ सालींच इंग्रजीत आला होता. बंडानंतर सन १८५९ त दिल्ली व तिच्याजवळचा भाग या प्रांतास जोडण्यांत आला. आतां या प्रांतांतच सिंधूचे पश्चिमेचा भाग व हिमालयाचे पायथ्याचा भाग हे सामील झाले आहेत. या प्रांतांतील वहुतेक भागांची लागवड नद्यांचे कालव्याचे पाण्यावर अवलंबून आहे, तेव्हां कालवे जास्त होऊन ते पाणी जसें जास्त पसरत जाईल, तशी वस्तीही त्याचे मागोमागच हल्लों निर्जन असलेल्या भागांत पसरत जाईल. हा प्रांत फार प्राचीन काळापासून अनेक परकीय राजांच्या आगमन-प्रत्यागमनाचे स्थान असल्यामुळे तेथें अनेक तन्हेच्या लोकांचे संमेलन झाले आहे. पश्चिमेकडील भागांत बहुतेक मुसलमान जास्त आहेत, मध्यभागांत शीख जास्त आहेत, व पूर्व बाजूस धर्म- परायण हिंदु लोकांची वस्ती आहे. हिमालयाचे नजीकचे भागांत बुद्ध धर्माचे व ब्राह्मण जातीय लोक आहेत व या पंथाचे लोक इतर ठिकाणी सांपडत नाहीत. मध्यप्रांत हा सन १८६१ साली वेगळा करण्यात आला. नागपूरचे राजा- चा १८५३ साली खालसा केलेला प्रांत व पेंढान्यांचे लडाईनंतर १८१८ साली शिंद्यांकडून घेतलेला सागर प्रांत व नागपूरकरांकडून घेतलेला नर्मदा प्रांत हे सर्व या इलाख्यांत येतात. त्याचे मुख्य स्थाने, नागपूरकरांची राजधानी, नागपूर शहर हेच आहे. सागर प्रांत शिवायकरून वाकीचे भागांवर मृगराजाची वरीच कृपा असते; अवर्षण सहसा पडत नाही. या प्रांतांतलि लागवडीसारखी असले- ली जमीन बहुतेक लागण झालेली आहे यामुळे पूर्वी हा प्रांत दाट वस्तीचे ठि- काणाहून जाणारे लोकांस जसा आश्रयस्थान असे, तसा यापुढे होणार नाही. अजमेर व मेरवाडा प्रांत-हे अजमीरचे कमिशनरचे अमलाखाली आहेत. अजमीर प्रांत शिंद्यांकडून सन १८२० साली घेण्यांत आला व मेरवाडा प्रांत मेर लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याचे पूर्वी दोन वर्षे ताव्यांत घेण्यांत आला होता. हे प्रांत राजपुतान्यांतील संस्थानांचे मध्यभागी आहेत व आतां अजमीर या प्रांतांत पर्जन्यवृष्टीचें मान फार अनिश्चित असते व चारा व पाणी यांची फार वेळा अडचण पडते. १८९१- ९२ हे साल त्यापैकीच संकटाचे गेले. अजमीरचे कमिशनर हे राजपुतान्यांतील गव्हरनर-जनरलाचे एजंटाचे हाता- खाली काम पहातात. वहाड-प्रांत हा हैदराबादचे निजामाने इंग्रज सरकारास तहाप्रमाणे मद-