पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७३ ) हो बंदरेही ज्या प्रांतांत आहेत त्या प्रांतांचा परदशाशों व्यापार चालण्यास ती मोठी योग्य अशी ठिकाणे आहत. कलकत्ता शहर हे बंगालचा व्यापारी माल ज्या जलमार्गाने जाता येतो त्या जलमार्गाचे तोंडाशी असल्याने, त्या प्रांतांतील माल परदेशी जाण्यास किंवा परकीय माल देशांत पाठविण्यास मोठे सोईचे आहे ; तसेच त्याच शहरांत त्या प्रांतांतील आगगाड्यांचे रस्ते येऊन मिळतात. गंगा नदीत नौकानयनास फार अडचणी होत्या, ही एक या बंदराची उणीव होती, परंतु नदीचे मागीची पाहणी झाल्याने व मार्ग दाखविण्यासंबंधानें बंदोवस्त चांगला झाल्याने ती उणीव आतां दूर झाल्यासारखी आहे. बंदरांतील व्यवस्थाही पोर्टट्रस्टाकडून चांगली ठेवली जात असून माल चडावेणे व उतरणें फार सोईचे झाले आहे. मुंबई -या बंदराचे बरोवरीचे दुसरे बंदर ह्मणजे मुंबईचे आहे व या दोन बंदरातूनच बहुतेक व्यापार होतो. कलकत्त्याचे वंदरांतून पूर्वी माल देशाचे जास्त भागास पुरावण्यांत येत होता, तितका विस्तृत भाग मुंबईचे बंदरास नव्हता; परंतु आतां मध्याहेंदुस्थानांतील व बंगाल-नागपूर रेलवे झाल्याने मुंबई बंदरास जास्त प्रांत मिळाला आहे. या बंदरांत दाक्षण व वायव्य प्रांतां- तून आगगाडर्डाचे रस्ते येऊन मिळतात. मुंबईचे बंदरांतून कापूस, गहूं व गळि- तोचों धान्ये वगैरे माल विशेष जाता; कलकत्त्याचे बंदरास हा माल असूनही शिवाय तीळ, चहा, जूट (ताग ), तांदूळ, कातडा, रेशीम व साखर वगैरे माल आहे. अफूही दोन्ही बंदरांतून जाते. मुंबई बंदरांत पुष्कळ माल येऊन तो फि- रून परदेशास रवाना होणारा असा असतो, यामुळे या बंदराचा आयात व्यापाराचा आंकडा थोडा जास्त फुगलेला दिसतो. हे बंदर दुसरे प्रकारानेही फार महत्वाचे आहे व तें महत्व वाढत जाणारे आहे. हे वंदर परदेशी व विशे- पत: युरोपास जाणारे येणारे लोकांचे चढण्याउतरण्याचे मुख्य ठिकाण झाले आहे, व विलायतेचे टपालाच्या व माणसें नेणान्या आगबोटी याच बंदरांतून जातात येतात; तेव्हां मुंबई बंदर हे हिंदुस्थानचे महाद्वार च झाले आहे व त्या दृष्टीने ते फार उत्कृष्ट व सोईचे ठिकाण आहे. मद्रास-मद्रास हे व्यापाराचे संबंधाने मोठे महत्वाचें बंदर नाही व ते मोठे सोईचेही नाही. मुंबई व बंगाल या प्रांतांतील व्यापार जसा इलाख्याचे मुख्य शहराचे बंदराबरोबरच होतो तशी मद्रासची स्थिति नाही. टुटिकोरिन, को- कंडा, मंगलोर, कालिकत वगैरे बंदरांतही पुष्कळसा व्यापार होतो. रंगून रंगून बंदर गेले वीस वर्षांपासून फार महत्वास येत चालले आहे; तें इरावतीचे काठी आहे व त्या नदीचे मार्गाने वरचे ब्रह्मदेशांतून व पेगू प्रांतां- १८