पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७२) फायदा होतो, त्याचे मोबदल्यांत मालास कमी किंमत येते ही तोट्याची वाव जाते, व व्यापारांत या कारणामुळे काही फायदा रहात नाही. व्यापाराचे वृद्धीचे मान.-आयात व निर्गत व्यापाराची वृद्धेि झाली आहे, त्यांत आयात व्यापार ज्या प्रमाणाने वाढला आहे त्या प्रमाणानें निर्गत व्यापार वाढला नाही. सन १८४१-४२ साली आयात व्यापार ९ कोटी ६३ लक्ष रुपयांचा झाला, व सन १८९१-९२ साली ८४ कोटी १५ लक्षांचा झाला, ह्मणजे वाढ पावणेनऊपट झाली आहे. निर्गत व्यापार सन १८४१-४२ साली १४ कोटी ३४ लक्ष रुपयांचा झाला व सन १८९१-९२ साली १११ कोटी ४६ लक्ष रुपयांचा झाला, हणजे वाढ पावणेआठपट झाली आहे. या रकमेत सोने व रुपे यांचा समावेश आहे. अलीकडे सोने व रुपे यांचा व्यापार सध्यासारखा झाला आहे, तेव्हां व्यापाराची खरी वाढ पाहण्यास ते जिन्नस सोडून खरे व्यापारी मालांत वाढ कशी झाली आहे ते पाहिले तर, आयात मा- लाची वाढ जवळ जवळ नऊपट पडते व निर्गत मालाची वाढ ७६ पडते असे दिसते. ही वाढ होण्यास जी कारणे झाली आहेत त्यांपैकी कांहीं मुख्य मुख्य येथे देतो. (१) यंत्रांत सुधारणा व वाफेच्या शक्तीचा यंत्रे चालविण्याकडे उपयोग. ह्यापासून श्रम व वेळ कमी लागतो व माल कमी खर्चात तयार होतो. (२) सुएझचा कालवा सुरू होणे. हा कालवा सुरू झाल्याने यूरोप व एशिया यांचे दरम्यान जाण्याये- ग्यास अंतर कमी झाले आहे व त्यामुळे प्रवासास श्रम व वेळ ही कमी लागतात. (३) गलबतें जाऊन त्यांचे बदली आगबोटी सुरू होणे. यामुळे प्रवास लवकर होऊन नियमाने होतो. (४) या दोन कारणांमुळेच माल नेण्याआणण्याचें भाडेही कमी झाले आहे. ही व्यापारास सोयच झाली आहे. (५) अप्रतिहत व्यापाराची तत्वे या देशांत अमलांत येणे. (६) आगगाज्यांची वृद्धि. याबद्दल माहिती पब्लिक वर्क्सचे भागांत येईल. (७) परकीय भांडवल या देशांत ये. ऊन नवीन धंदे सुरू होणे-उदाहरणार्थ चहा, काफी वगैरेंची लागवड. याप्रमाणे व्यापार वृद्धीस कारणीभूत झालेल्या मुख्य गोष्टी आहेत. या व्यापारवृद्धीपासून देशावर परिणाम कसे झाले आहेत त्यांबद्दल देशस्थितांचे भागांत सांगण्या- व्यापाराची मुख्य वंदरें-कलकत्ता.-जलमार्गाने होणारा व्यापार म- ख्यत्वेकरून कलकत्ता, मद्रास, मुंबई, कराची व रंगून या बंदरांतून चालतो. हिंदु- स्थानाचा समुद्रकिनारा नऊ हजार मैलांपेक्षा जास्त आहे व त्याचे कांठी बंदरेही तीन साडेतीनशे आहेत; तरी व्यापार सदरचे पांच बंदरांशीच मुख्यत्वेकरून होतो. त येईल.