पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७१) ती देतेवेळी सांगण्यात येईल. याप्रमाणे नेहमीपेक्षा जास्त माल येण्याने व रुपे अतिशय येण्याने हिंदुस्थानसरकारांनी अजमास केल्याप्रमाणे रुपयाची किंमत चढली नाही. आयात मालापेक्षां निर्गत माल जास्त होऊन त्याबद्दल पैसा पाठविण्याचा जेव्हां प्रसंग येईल तेव्हांच रुपयाची किंमत चढण्याची संधी येणार; ती संधी आयात माल जास्त आल्याने आली नाही. याशिवाय आणखी एक कारण झालें तें असें की, हा कायदा अमलांत आला तो व्यापाराचा मोसम नसतांना ह्मणजे पावसाळ्यांत आला व परदेशी माल जाण्याचे त्या दिवसांत वंद असल्याने व्यापायांस इकडे ऐवज पाठविण्याची जरूर लागली नाही. पुढे स्टेटसेक्रेटरींनी आपली बिले अमुकच भावाने मिळतील असें ठरविल्याने, व्यापा- न्य नी वर सांगितल्याप्रमाणे इकडे जास्त माल व चांदी पाठवून आपली गरज भागवून घेतली. अमुकच दराने विलें विकण्याचें सन १८९४ चे जानेवारीत वंद झाले व तव्हांपासून व्यापाराचे क्रमाने व त्याचे गरजेचे मानाने रुपयाची किंमत स्थिर होत चालली आहे व ती कितीही कमी असली तरी त्यांतील चांदीचे किमतीपेक्षा काही जास्त असते. रुपयाची किंमत त्यांतील चांदीचे किंमतीपेक्षा जास्त झाल्याने चांदीचे नाणे ज्या देशांत चालू होतें अशा चीन वगरे देशांवरोवर जो या देशाचा व्यापार होतो यास, हा कायदा झाल्यावर काही मुदतपावेतों फारच हिसका वसला. नवीन व्यवस्था झाल्याने रुप्याचे नाणे चालू असणारे देशांवरोबर जो व्यापार होतो त्यांत गडवड होईल असा पूर्वीच कयोस झाला होता. तशी स्थिति कांहीं दिवस टिकली, परंतु पुढे नवीन स्थितीचे मानाने मालाच्या किंमती ठरून गेल्या- वर पूर्वीप्रमाणे व्यागार चालू लागला आहे, असा मि० ओकानरसोहवांनी अभिप्राय दिला आहे. चांदीचा भाव उतरल्यामुळे हिंदुस्थानचा व्यापार काढला असे प्रतिपादन केलेले वारंवार दृष्टीस पडते. या मंडळाचे मणणे असें आहे की, या देशांतील मालाची सोन्याचे मानाने जी किंमत आहे तिचेबद्दल पूर्वी जितके रुपये येत असत त्यांचेपेक्षां आतां जास्त रुपये येतात, त्यामुळे इकडील व्यापाऱ्यांस मा- ल खस्त विकण्यास सांपडतो व शेतक-यांसही जास्त किंमत मिळते, व याचा परिणाम असा होतो की त्यापासून व्यापार वाढतो इतकेच नाही तर माल- ही जास्त तयार होतो. ह्या प्रतिपादनाची अयथार्थता मि. ओकानर यांनी सन १८८६ साली सिद्ध करून दिली आहे. पूर्वी मालास ज्या किमती येत असत तशा आतां परदेशांत येत नाहीत. तेव्हां चांदीचा भाव उतरल्यामुळे जो काही