पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६९) स्था करण्यास हरकत नाही असा अभिप्राय दिला; व त्या सूचनांत दुरुस्ती करण्यास सुचविली ती अशी की, टांकसाळीतून लोकांस चांदी घेऊन रुपये पाडून देण्याचे बंद केले तरी, सोने आणले तर रुपयाची एक शिलिंग चार पेन्स अशी किंमत धरून त्याचेबदली रुपये द्यावे ; व त्याच प्रमाणाने सरकारी देण्याऐवजी सोनें सरकारी खजिन्यांत घेण्यास परवानगी असावी. ही दुरुस्ती करण्याचे हिंदुस्थानसरकारांनी कबूल केल्यावर त्यांच्या सूचना अम- लांत आणण्यास स्टेटकेटरीनी परवानगी दिली व त्याप्रमाणे २६ जून १८९३ रोजी कायदा झाला. हा कायदा होईपर्यंत रुपयाची किंमत त्यांत असलेले रुप्याचे मानाने असे, ती स्थिति या नवीन सुरू केलेले व्यवस्थेनें पालटली व रुपयास एक विशेष प्रकारची कृत्रिम किंमत आली. पूर्वीप्रमाणे वाटेल त्यास टांकसाळीत रुपये पाडून मिळत नसलेमुळे, हल्ली जे रुपये पडलेले आहेत तेच काय ते चालू राहाणार; मागणी अ- सेल त्या मानाने मालाचा परवठा नसला ह्मणजे त्या मालाची किंमत चढते असा नियम आहे, त्याप्रमाणे रुपये पाडण्याचे बंद झाले व हल्लींप्रमाणे त्यांची जरूर कायम राहिली किंवा जास्त वाढली ह्मणजे, अर्थातच गरजेपेक्षां रुपयांची संख्या कमी पडून ते मिळत नाहीतसे होतील, व तसे झाले ह्मणजे रुपयाची किंमत वाढेल व ती त्यांत असलेले रुप्याचे मानाने जी किंमत असण्याची त्या- पेक्षा जास्त होईल. रुपयाची किंमत जास्त झाली ह्मणजे सोन्याचे व रुप्याचे दरम्यान किंमतींत में अंतर आहे ते कमी होईल व सोन्याचे नाणे चालू असलेले देशांस ऐवज पाठविणे झाल्यास पूर्वीचे मानाने कमी रुपये पाठवावे लागतील. अशी स्थिति व्हावी या विचारानेच हिंदुस्थान- सरकारांनी वर सांगितल्याप्रमाणे नाण्याची किंमत बदलण्याचा प्रयत्न केला. ही व्यवस्था करण्याचे हेतु (१) रुप्याचे नाण्याची किंमत बदलण्याचें बंद करावें; (२) रुप्याचा भाव उतरण्याचे बंद करावे; (३) सोने देशांत जास्त येईल असे करावे, असे होते. ज्या भावी स्थितीवर नजर ठेऊन हा खटाटोप केला ती स्थिति अजून तरी, पहिल्याने जितके प्रमाणाने होईल असा अजमास के- ग होता तितके प्रमाणानें, झालेली नाही. पुढे ती स्थिति येईल किंवा नाही याव- दल अजूनही काही लोकांस शंकाच आहे. रुपयाची किंमत जशी उतरली असती तशी ही व्यवस्था अमलांत आल्याने, ती उतरण्याचे बंद झाले असे सर- कारतर्फे व सदरचे व्यवस्थेस अनुकूल असलेले लोकांचे ह्मणणे आहे. हा विषय शास्त्रीय असून फार गहन आहे व उभयपक्षांचे मतांतर पूर्वीपेक्षा काही कमी झाले असें नाहीं, तेव्हां या पुस्तकाचे सरणीस अनुसरून दिलेले वर्णन