पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६७ ) १८८९-९० इंडियन मिडलंड रेल्वे पुरी झाली. १८९०-९१ बंगाल-नागपूर रेल्वे पुरी झाली. १८९३-९४ टांकसाळी बंद झाल्या. १८९४-९५ आयात मालावर जकाती बसल्या व देशांत तयार झालेले कापसाचे मालावर कर बसला. आयात मालावरील जकातीसंबंधान पूर्वी हकीकत दिलीच आहे. नाग्याचे बाबतींतील अलीकडील फक-टांकसाळी बंद झाल्या त्याचे संबंधाने थोडी माहिती देणे अवश्य आहे ती देतो. या देशाचा व्यापार ज्या दे- शांशी होतो यांपैकी कांहों देशांत सोन्याचे नाणे चालू आहे व काही देशांत रुप्याचे नाणे चालू आहे. काही देशांत या दोन्हीही धातूंची नाणी ( त्यांचे किमतीतील प्रमाणे ठरवून ठेवून त्याप्रमाणे ) चालण्याचा ठराव आहे; परंतु आतां त्या देशांत रुप्याचे नाणे पाडण्याचे बंद झाल्याने ते देशही वस्तुतः सो- न्याचे नाणे चालविणारेच झाले आहेत. काही वर्षांपूर्वी सोन्याची व रुप्याची जी किंमत होती त्या मानाने रुपया ह्मणजे दोन शिलिंग, किंवा पौंडाचा दहावा भाग असे किमतीचा होता. हल्ली सोन्याचे मानाने रुप्याचा भाव कमी झाल्यामुळे रुपयाची किंमत समारे एक शिलिंग व एक पेनी जवळ जवळ आली आहे, ह्मणजे बहुतेक निम्यावर आली आहे. याप्रमाणे या दोन धातूंचे किंमतीत अंतर पडून रुप्याची अर्थात रुपयाची किंमत कमी होत जाण्यास सुरुवात सन १८७२ पासून झाली. विलायतेस सोन्याचे नाणे पहिल्यापासून होतेच ; परंतु युरोपातील इतर देशांत अलीकडेपर्यंत रुप्याचे नाणे चालू असल्यामुळे त्या धातूची किंमत चांगली टि- कत होती. त्या सालानंतर यूरोपांतील बहुतेक मोठाले देशांत सोन्याचे नाणे सुरू झाले आहे. जर्मनी, स्वीडन, नार्वे या देशांनी सन १८७३ साली रुप्याचे नाणे बंद करून सोन्याचे नाणे चालू केले. फ्रान्स वगैरे देशांत, दोन्ही धातुंच्या ठरीव प्रमाणाने किमती धरून, दोन्ही धातूंची नाणी चालू होती व आहेत, परंतु त्याही देशांनी रुप्याची नाणी पाडण्याचे बंद केलें. पूर्वी युनायटेड स्टेट्स्मध्ये कागदी नाणे असे व त्याचे बदली सरकारांतून रोख पैसे मिळत नसत; परंतु याही देशाने दोन्ही नाणी चालू ठेवण्याचे बंद केले. इतर देशांनीही याच क्रमाचे अवलंबन केले, त्यामुळे बरेच देशांत रुप्याचा खप कमी झाला व त्या- ची किंमत सोन्याचे मानाने फार उतरली. या हिंदुस्थान देशांतील नाणे रुप्याचें, व ज्या देशांशी व्यवहार करावयाचा त्यांपैकी बरेच देशांत नाणे सोन्याचें, असें झाल्याने व रुप्याची किंमत उतर- ल्याने या देशाहून इतर देशांस ऐवज पाठविण्यास पूर्वीपेक्षां आतां जास्त खर्च .