पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६५) देश सुधारलेले असल्यास ते त्या जिनसांची अदलाबदल करतात व याप्रमाणे व्यापारास सुरवात होते. व्यापाराचे जिन्नस तीन प्रकारचे असतात. खनिज, प्राणिवर्गापैकी व शेत- कीने प्राप्त होणारे. या तीनही प्रकारचे संपत्तीसंबंधाने या देशास कशी अनुकूल- ता आहे हे पूर्वी सांगितलेच आहे. अज्ञान, आलस्य, वगैरे अनेक कारणांनी या देशांत असलेली खनिज संपत्ती असून नसल्यासारखीच आहे; व तशाच कारणांनी उद्भिज वस्तु ज्या प्राप्त आहेत त्या तयार करून उपयोगालायख करण्याचेही फारच कमी प्रमाणावर चालू आहे. तेव्हां हल्ली या देशाची स्थिति ह्मणजे शेतकी करावी व उत्पन्न होईल त्याची अदलाबदल करून जरूर त्या वस्तु प्राप्त करून घ्याव्या अशीच आहे. या देशांतील शेकडा ६९ लोक शेत- कीवरच उपजीवन करणारे आहेत. हा देशही चांगला सुपीक असून विस्तृत आहे यामुळे भुसारमाल व कापूस वगैरे शेतकीचा माल या देशाने फार वा- हेर जातो. या विषयाचा सर्व दिशांनी व शास्त्रीय रीतीने विचार करणे या पुस्तकाचे हेतूबाहेर आहे. व्यापाराची हल्लींची स्थिति कशी आहे ह्यणजे तो किती होतो, कोणते देशांशी होतो, कोणते जिनसांचा होतो हेच विशेषेकरून येथे सांगण्याचे आहे. बराच व्यापार परदेशांशी जलमार्गाने होतो व त्याबद्दल विशेष माहिती सांगण्यात येईल. त्यानंतर खुष्कीने होणारे व्यापाराबद्दलही थोडी हकीकत सांगण्यांत येईल. जलमार्गाने होणारे व्यापाराबद्दल जशी फार दिव- सांची व व्यवस्थित अशी माहिती मिळते तशी खुष्कीवरून होणारे व्यापारा- संबंधाने मिळत नाही. त्या मार्गाने व्यापारही फारसा होत नाही. व्यापाराची वाढ-जलमार्गाने होणारा व्यापार किती होतो व त्याची वाढ कशी होत गेली आहे ते पुढील कोष्टकावरून समजेल. सन १८९१-९२ सालापर्यंत पांच पांच वर्षांची सरासरी दिली आहे व शेवटी सन १८९१-९२ व १८९३-९४ सालांबद्दलचे आंकडे दिले आहेत. सालें. आयात व्यापार. निर्गत व्यापार. कोटि लक्ष रु. कोटि लक्ष रु. ४०-४१ ते ४४-४५ ११-७९ १५-५२ ४५-४६-४९-५० १२-४ १७-११ ५०-५१-५४-५५ १६-६ ५५-५६-५९-६० ३२-२ २७-५८ ६०-६१----६४-६५ ४२-८४ ५१-२८ ५४-४७ २०-४