पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६४) ब---चालू नसलेल्या कंपन्या क- चालू न झालेल्या कंपन्या २२२ १२२ ६०२ ८०८ ११४९ २३६० बेरीज यावरून सर्व प्रकारचे व्यवहारांत वाढ आहे असे दिसून येईल. भाग चवदावा. व्यापार. या भागांत या देशाचा परराष्ट्रांशी व्यापार किती होत आहे हे सांगावयाचे आहे. व्यापाराची हकीकत देणे ह्मणजे देशसुधारणेची हकीकत-लोकांच्या गरजा व त्या भागविण्यास वेगळाले काली योजलेले उपाय यांची माहिती, देणे होय. कांही देशांतील लोकांस शरीरसंरक्षणाव्यतिरिक्त दुसरे प्रकारच्या गरजाच नसतात, व त्यांचा व्यवसाय उपजीविकेची साधनें गोळा करणे हाच काय तो असतो. अशा लोकांत सुधारणा होत नाही व ती होण्याची त्यांस जरुरीही वाटत नाही. इतर काही राष्ट्रे अशी आहेत की, त्यांस उदरपूर्ती- शिवाय इतर पुष्कळ गरजा असतात व त्यांस सुखवैचित्र्य व चैनवाजी यांची अपेक्षा वाटते. देशांच्या गरजा व त्या पुरविण्याचे सामर्थ्य चांवरून त्या दे- शाचे सुधारणेत पाऊल किती पडलें आहे हे समजते. ह्या सर्व प्रकारच्या गर- जा भागविण्यास जे पदार्थ लागतात ते सर्वच ज्या त्या देशांत प्राप्य असतात असें नाहीं. उदाहरणार्थ, इंग्लंड देश व्या-तेथील लोकारा पुरेसे धान्य त्या देशांत उत्पन्न होत नाही; परंतु त्या देशाची खनिज संपत्ति फार मोठी आहे व लोक कल्पक, मेहनती व धाडशी आहेत; तेव्हां ते कच्चया मालाच्या जिनसा तयार करून त्या परदेशांत पाठवितात व आपल्यास हवें तें धान्य वगैरे जि- नसा परदेशांतून आणवितात. अशीच बहुतेक सर्व देशांची स्थिति असते. अशी जिनसांची अदलाबदल होण्याची ती देशांचे नैसर्गिक स्थितीवर, ह्मणजे त्यांचे जमिनींचा प्रकार व सुपीकपणा, हवापाणी, व्यापारोपयोगी पदार्थांची विपुलता, लोकांची स्थिति, वगैरे कारणांवर अवलंबून असते. ह्या गोष्टींपैकी कांहों एका देशास अनुकूल असतात तर काही दुसरे देशास अनुकूल असतात. हे दोन्ही