पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११ ) भागांत पर्जन्य चांगला पडतो व दुष्काळ ही अननुभूत वस्तु आहे. एकंदर बंगाल प्रांत चांगला सुपीक आहे. छोट्या नागपुरांत वस्ती कमी असण्याचे कारण तेथील हवा वाईट आहे हे आहे. आसाम-बंगाल इलाख्यांतून आसाम प्रांत १८७४ साली वेगळा करण्यांत आला. हा प्रांत ह्मणजे दोन मोठाली खोरी व त्यांचे भोंवतालचा व मधील डों- गराळ प्रांत मिळून होतो. सुर्मखोरें मोगलांकडून दिवाणी मिळाली त्यांत आले. कचर प्रांत तेथील राजा मेल्यावर १८३२ साली खालसा करण्यांत आला. खरा आसाम प्रांत ह्मणजे ब्रह्मपुत्रेचे खोरे हे ब्रह्मी लोकांनी १८२६ चे लढाईनंतर इंग्रज सरकारास दिले. खासी व जंतिया हे डोंगरी प्रदेश त्या प्रदेशांतील डोंगरी लोकांचे मुख्यांचे ताब्यात आहेत. नागा, गरो व लुशाई व दुसरे डोंगरी प्रदेश हेही त्याचप्रमाणे वहिवाटले जात आहेत तरी या सर्वांवर अंमल इंग्रज सर- कारचाच आहे. या देशांत जमीन सुपीक आहे व चहाची लागवड सुरू झाल्या- पासून तेथे बाहेरून मजुरीस लोक पुष्कळ येतात व तेच पुढे स्थाईक होऊन राहतात. या प्रांतांत दुष्काळ कधीही पडत नाही. वायव्य व अयोध्या प्रांत-वायव्य प्रांतास अयोध्या प्रांत सन १८७७ साली जोडण्यांत आला. दोन्हींवर एकच लेफ्टनेंट गव्हरनर असे तरी अलीक- डेपर्यंत त्यास नार्थवेस्ट प्रांताचा लेफ्टनेंट गव्हरनर व औधचा चीफ कामशनर असें ह्मणण्यांत येत असे. या प्रांतांतील मुलूख हा कांहीं पूर्वीचे अयोध्या प्रांता- पैकी आहे व काही शिंद्यांकडून सन १८०५ साली व कांही १८१६ साली गुर- ख्यांकडून व कांही नागपूरचे राज्यापैकी सर करून असा घेण्यात आला आहे. या दोन्ही प्रांतांत हवापाणी, जमिनी वगैरेसंबंधाने अत्यंत साम्य आहे. अयोध्या प्रांताचे राज्य दिल्लीचा वजीर सादत अल्लीखान याने सन १८३२ साली स्थापन केले व पुढे निजामाप्रमाणेच तोही आपल्यास स्वतंत्र संस्थानिक असें ह्मणवून घेऊ लागला. सन १८२० सालापर्यंत संस्थानाधिपास नबाब वजीर हेच नांव चालत असे, परंतु तें नांव जाऊन राजा हे नाव त्या सालापासून सर- कारी रीतीने देण्यांत आले. ह्या राज्यांत बखेडे फार झाले व राजाच्याने ते मोडवेनात ह्मणून ते राज्य १८५६ साली खालसा करण्यात आले. शिंद्याने झांशी देऊन मुरार किल्ला मोबदला घेतला. या प्रांतांचे राजधानीचे ठिकाण अलहाबाद आहे व लखनौ येथेही लेफ्टनेंट गव्हरनरसाहेबांची वसति दरवर्षी काही दिवस असते; या प्रांतास आतां कायदे करण्याचा स्वतंत्र अधिकार मि- ळून कायदेकौन्सिल स्थापन झाले आहे. पंजाब-हें नांव व्युत्पत्तीप्रमाणे ह्मणजे पंचनद्यंतरवर्ति प्रदेशासच लावण्याचे,,