पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६२) साल १८ १८८१-८२ या गिरण्यांपैकी सन १८९३-९४ साली मुंबई इलाख्यांत ९४; मद्रास इला- ख्यांत ११; कलकत्त्यांत किंया अगदी जवळ मिळून ८; वायव्य प्रांतांत ५; पंजाव व दिल्ली येथे एक एक व मध्यप्रांतांत ५ व बाकीच्या इतर ठिकाणी आहेत. या गिरण्यांतून माल किती होतो हे समजण्यास साधनीभूत माहिती- में पत्रक प्रसिद्ध होत नाही. सन १८८० सालचे मानाने पाहतां सूत परदे- शांतून पूर्वीपेक्षां शेकडा १० टक्के जास्त येते व हिंदुस्थानांतून पूर्वीपेक्षां परदेशांत पांचपट जास्त जाते. कापड पूर्वीचे मानाने परदेशांतून सुमारे सहा टक्के जास्त येते व या देशांतील कापड पूर्वीपेक्षां सुमारे अडीचपट बाहेर जातें. जूट (ताग)-जूटचे कारखाने बहुतेक कलकत्ता येथे व वंगाल्यांत काही ठिकाणी मात्र आहेत. शिवाय कानपूर व विझागापटण येथे अशा दोनच गिरण्या दुसरीकडे आहेत. पहिली गिरणी सन १८५७ साली स्थापन झाली, तरी बहु- तक गिरण्या सन १८७४ चे पुढील आहेत. या गिरण्यांचे वाढीवद्दल माहिती देतो. संख्या. सन १८७६-७७ २१ १८८६-८७ १८९१-९२ १८९३-९४ आतां जूट व जूटचे केलेले कापड परदेशांस जाण्याचे मान पाहतां पूर्वीचे मानानें जूट सुमारें दिढीने जास्त जातो व जूटचे कापड पूर्वीपेक्षा दुप्पट जातें. कागदाच्या गिरण्या बंगाल इलाख्यांत व पुणे, लखनौ व ग्वालेर येथे मिळून ८ आहेत व त्यांत भांडवल सुमारे पन्नास लक्ष रुपये आहे. कागदही चांगले निघत चालले आहेत. लोकरीच्या गिरण्या कानपूर, धरीवल, बंगलूर व मुंबई येथे आहेत व लांतू- न पोलिसास व एतद्देशीय लष्करास कपडा बराच घेण्यात येतो. रेशमाच्या गिरण्या मुंबई व कलकत्ता व पुणे येथे आहेत, व काही लहान लहान कारखाने बंगाल्यांत आहेत. या कारखान्यांतून सन १८७५-७६ साली २४६८०५२ यार्ड कापड रु० २३८०००० किमतीचें परदेशांस गेलें व सन १८८०-८१ साली रु० २२०४२२० चा माल गेला व तेथून पुढे दहा वर्षांत सरासरीने रु० ३३१९२०० चा माल गेला. इतर कारखाने-सन १८९१-९२ साली कापूस दावण्याचे कारखाने ४००, सोडा- २४ २८