पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८९३-९४ साली ४९२ लक्ष ग्यालन अमेरिकेंतून आले होते व ३४० लक्ष ग्यालन तेल रशियांतन आले. सन १८९३ साली या देशांत १०३ लक्ष ग्यालन तेल किंमत रु. ७९७२६५ चें निघालें होतें. से. ने- सोने बहुतेक सर्व देशांत सांपडतें. तें सांपडते ती ठिकाणे देतो. (१) मद्रास इलाखा-त्राव्हणकोर, मदुरा, सालेम, मलबार, वायनाद, को- इंबतूर, अर्काट, निलगिरी, व दक्षिण कानडा. (२) ह्मसूर व हैद्राबाद संस्थाने. (३) बंगाल प्रांत-- ओरिसा, मिदनापूर, वंकुरा, चंपरण जिल्हे, छोटा नागपूर, मनभम सिदभुम, उदैपूर, दार्जलिंग. (४) मध्य हिंदुस्थान--अजमीर मरवाड प्रांत. (५) मध्य प्रांत-छत्तिसगड, नागपूर, जबलपूर, गोदावरी जिल्हा. (६) मुंबई इलाखा-धारवाड, बेळगांव, कलादगी जिल्हे व काठेवाड प्रांत. (७) पंजाव-वन्नु, पेशावर, हजारा, रावळपिंडी, जेलम, कांगरा, अंबाला, गुरगांव, दोसियारपूर. (८) वायव्य प्रांत-विजनोर, नैनिताल, गरव्हाल. (९) खालचा ब्रह्मदेश व वरचा ब्रह्मदेश. हँसूर व वायनाद या ठिकाणांशिवाय इतर ठिकाणी सोने काढण्याचे काम जारीने चालू नाही. त्या दोन भागांत मात्र युरोपियन लोकांचे देखरेखी- खाली व चांगले पद्धतीप्रमाणे सोने काढण्यात येत आहे. ाँसुरांत सन १८९२ खाली १६३१८८ औंस सोने जवळजवळ ९९ लक्ष रुपयांचे निघाले. बाकीचे प्रांतांत तें झारेकऱ्यासारखें धुवून काढण्यात येते, तें विशेष निघतही नाही. मीठ-पंजावांत खाणींतून मीठ निघते. सन १८९३ साली या खाणीतून मीठ १०४५२२ टन किंमत रु. ४६४४८९ चे निघाले होते. मौल्यवान धोंडे-हिरे छोटा नागपूर, मध्यप्रांत, कृष्णेचे खोरे, मद्रास इलाख्यांत अनंतपूर, कडप्पा, कर्नूल व गोदावरी जिल्हा, बुंदेलखंड व हैद्राबाद या प्रांतांत सांपडतात. हिरे काढण्यासाठी कंपन्यांकडून प्रयत्न चालू आहेत परंतु कोठेच विशेषसे बांगले व पुष्कळ असे हिरे सांपडले नाहीत. हैद्राबाद संस्थानांत सन १८९१ साली रु. १५५३० चे व बुंदेलखंडांत सन १८९२ साली रु. ९३३१ ले हिरे सांपडले होते.