पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५९) पासून विलायती कोळशाचे प्रमाणाने एकद्वितीयांशापासून दोन तृतीयांश काम होते. विलायती कोळशांत गुण जास्त आहेत तरी तिकडून इकडे आणण्याचे खर्चाने याची किंमत फार वाढते, यामुळे बंगाल व ब्रह्मदेशांत या देशांतील कोळसा स्वस्ता पडतो. या देशांतील कोळशापैकी निम्मे आगगाड्यांकडे खर्च होतो. या देशांतील कोळसा सिलोन, जाव्हा, स्ट्रेट्स् सेटलमेंट येथे जातो. मुंबई व मद्रास इलाख्यांत कोळशाच्या खाणी मुळीच नाहीत. परदेशांतून को- ळसा पुष्कळ येतो, परंतु अलीकडे कारखान्यांत पुष्कळ वाढ झाली आहे तरी त्या मानाने कोळसा येण्यांत वाढ झाली नाही. गंगा व गोदावरी या दोन नद्यांचे दरम्यानचे प्रदेशांतच विशेषेकरून कोळसा आहे. गोदावरीचे दक्षिणेस कोळसा सांपडत नाही; गंगेचे उत्तरेसही फार थोडे ठिकाणी सांपडतो. लोखंड-लोखंड हिंदुस्थानचे सर्व भागांत सांपडते; विशेषेकरून मद्रास इला- ख्यांत सालेम, बल्लारी व कुर्नुल येथें, मध्यप्रांतांत वरोरा व जबलपूर येथे व बंगा- लचे पश्चिम भागांत सांपडते. युरोपीय पद्धतीवर लोखंड गाळण्याचे बंगाल्यांत- च चालू आहे. या प्रांतांत बरकर येथे लोखंडाचा मोठा कारखाना स्थापन झाला आहे व त्यांत तयार झालेले लोखंड सर्व खपते. मुंबई इलाख्यांत घाटाचे मागांत व मद्रास इलाख्यांत सालेम व भोवतालचे भागांत काही लोखंड गाळ- ण्यांत येते; आतां हा धंदा बसल्यासारखा झाला आहे. लोखंड गाळण्यास मुख्य अडचण सर्पणाची पडते. सन १८९३ साली ३७१०२ टन लोखंड रु. २३१३७१ किमतीचे निघाले होते. पेट्रोलियम तेल-हें वरचे ब्रह्मदेशांतच मुख्यत्वेकरून सांपडते. खालचा ब्रह्मदेश, आसाम, पंजाव या प्रांतांतही काही सांपडते. वरचे ब्रह्मदेशांतील यिनानचांगजवळ याच्या १०० पेक्षा जास्त विहिरी आहेत व त्यांतून सन १८९३ साली एक कोटि ग्यालन तेल निघाले होते. शिबी हरणई आगगाडीचे रस्त्यावर खट्टन येथील विहिरीतून गेले १० सालांत सुमारे ४ लाख टन तेल निघालें, परंतु तेथील तेलाचा साठा संपण्याची चिन्हें दिसत आहेत. आसा- मांतील मकम येथील विहिरीतून तेल चांगले निघते. परंतु अजून पुष्कळ निघू लागले नाही. या देशांत या तेलाचा प्रसार किती झाला आहे तें परदेशांतून आलेले तेलाचे आंकडे खाली दिले आहेत त्यांवरून दिसेल. ग्यालन किंमत रु. सन १८७५ ६२३८६४ ४४९३७० १८८१-८२ ९८८३०४९ ५०४०३३० १८९१-९२ ५८१०९२८३ २३६८१४०० १८९३-९४ ८३६६६८६३ ३०९४७३४५०