पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५८) पडल्यास, तपासणीकरितां यावी ह्मणून, त्या काही मुदतीनें, उदाहरणार्थ १० वर्षांच्या मुदतीने, दिल्या असतां वरें पडेल. चालू आहेत. भाग तेर वा. खाणी व कारखाने हिंदुस्थान देशांत खनिज पदार्थ कोठे कसे आहेत याचा शोध जिआलाजि- कल सव्र्हेचे (भूमीचे रचनेची पहाणी करणारे) अंमलदार आहेत ते करतात व त्या माहितीप्रमाणे पुढे ती द्रन्ये काढण्याचे संबंधाने उद्योग होतात. सध्या दगडी कोळसा, सोने व पेट्रोलियम तेल या तीन द्रव्यांचसंबंधाने खाणी चांगल्या दगडी कोळसा-हा काढण्याचे काम चांगले प्रकाराने चालले आहे. बंगाल्यांत राणीगंज येथे कोळसा असल्याचे सन १७७४ पासून माहीत हातें व तो काढ- ण्यास सुरवातही सन १७७७ पासून झाली होती. या ठिकाणचा कोळसा लवकर निघतो तरी तो गुणांत कमी असतो. कहरबरी येथील कोळसा चांगला असतो. सन १८९१-९२ साली वंगाल्यांतील खाणींतून एकंदरांपैकी कोळसा निवाला होता. त्या साली हिंदुस्थानांत एकंदर ८७ खोणी होत्या. त्यांपकों ७७ बंगाल्यांत, मध्यप्रांतांत बरोरा यथें एक व मोहपाणी येथे एक अशा दोन, निजामाचे हद्दीत सिंगारणी येथे एक, पंजावांत दंडोत येथे एक, बलुचिस्थानांत खोस्त येथे एक, आसामांत ३, रेवा संस्थानांत उमरिया येथे एक, अशा खाणी होत्या. बंगाल्यांत सर्वांत मोट्या दोन खाणी आहेत त्या ईस्ट इंडिया कंपनी ह्मणजे सरकार चालवितें, बाकीच्या खाजगी कंपन्या चालवितात. पंजाबांतील, वरोरा येथील, रेव्यांतील व बलुचिस्थानांतील खाणीही सरकार चालवितात. बाकीच्या कंपन्यांकडे आहेत. एकंदर सर्व खाणीतून सन १८७५-७६ साली १० लक्ष टन कोळसा निघाला होता; सन १८९१-९२ साली २३ लक्ष टन निघाला होता; ह्मणजे दुपटीवर वाढ झाली आहे. ब्रह्मदेशांत अलीकडे खाणी काढल्या आहेत व त्यांतून सन १८९३ साली १९३८ टन कोळसा निघाला होता. सन १८९३ साली २५२९८५५ टन कोळसा, रु. ८६०७८६० चा निघाला होता. त्यापैकी इंग्रजी मुलखांत २२५७९९२ टन निघाला होता व २७१८६३ टन संस्थानिकांचे हद्दीत निघाला होता. विलायती कोळशापेक्षां इकडील कोळशांत राख जास्त असते, त्यामुळे त्याचे.