पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५७) जंगलांच्या व्यवस्था करितांना लक्षांत वागविली पाहिजेत अशी हिंदुस्थानसर. काराची इच्छा आहे. ह्या तत्वांची तपशीलवार अंमलबजावणी नानातन्हांच्या अनेक गोष्टींवर अवलंबून राहील व त्या गोष्टींची योग्यायोग्यता स्थानिक अधि- काऱ्यांनी प्रत्येक प्रसंगी पाहिली पाहिजे व त्यांचा निकाल करणे तो त्यांचे मुखत्यारीवरच सोपविला पाहिजे, ही गोष्ट हिंदुस्थानसरकारास पूर्णपणे अगवत आहे. व्यापाराच्या कामांकरितां ज्या सवलती दिल्या जातील त्यांचा दगल- वाजीने दुरुपयोग करण्याची जी भीति आहे तीविषयीं सावधागेरी बाळगणे हे आतशय कठिण काम आहे ; आणि ही भीति कशी उत्तम रीतीने टाळितां येईल हे ठिकठिकाणच्या स्थितीवरून मात्र कळणार आहे. जंगलांत उत्पन्न होणाऱ्या जिनसांची व्यवस्था करण्याची जी अधिक सुलभ रीत आहे ती शेत- करी लोकांस लागू करावी ह्मणून गव्हरनर-इन्-कान्सिल यांची इच्छा आहे. परंतु ती रीत चालू करण्याचे कामांत जंगलासंबंधाने दिलेल्या सवलतीचा उपयोग लोकांनी, योग्य रीतीने लावून दिलेल्या निबंधाप्रमाणे, करावा ह्मणून विशेषेकरून खरोखर राखून ठेवलेल्या क्षेत्रावर फार काळजी घेऊन देखरेख ठेवणे जरूर आहे. परंतु दुसऱ्या पक्षी पहातां हिंदुस्थानसरकारास वाटत आहे की, कांहीं प्रांतांत ह्या व्यवस्थेनें हल्ली असलेले नोकर वगैरे लोक बरेच कमी करितां येतील आणि या सरकारची अशी इच्छा आहे की, वर बारावे कलमांत जे सांगितले आहे त्यासंबंधाने ह्या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करावा. सर्व प्रांतांतून जंगलाच्या संबंधाने जशी व्यवस्था असावी अशी या सरकारची इच्छा आहे तशी व्यवस्था कांहीं प्रांतांतून मागेच झालेली आहे. सार्वभौम हितास विरोध येणार नाही अशा धोरणाने लोकांच्या स्थानिक गरजा जाणून त्या भागविण्याचे कामी सर्व स्थानिक सरकारांस व प्रांताचा राज्यकारभार चालविणाऱ्या आधिकाऱ्यांस हिंदुस्थानसरकार मनापासून मदत देईल असे आश्वासन आतां आपल्यास मिळाले आहे, हे पाहून त्यांस आनंद होईल असा गव्हरनर-इन-कौन्सिल यांचा समज आहे. जंगलांची व्यवस्था कशी लावावयाची याजबद्दलच्या उपायांची योजना करण्यांत येईल त्या वेळेस या कामाकरितां अवश्य लागणाऱ्या सर्व तजविजी त्यांत दाखल करून ठेविल्या पाहिजेत. जंगलाबद्दलचे ठराव करतेवेळी जे हक्क नोंदून ठेविले असतील ते हक कसे चालवावे याविषयी या व्यवस्थेमध्ये तजवीज करून ठेविली पाहिजे. ज्या ठिकाणी मेहेरवानीखातर आणि अधिकार द्यावयाचे या हेतूने जास्त सवलती दिल्या असतील त्या ठिकाणी त्या सवलती, जी स्थिति मनांत आणून दिल्या असतील, ती स्थिति जसजशी बदलत जाईल त्याप्रमाणे वेळोवेळी जरूर