पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५६) दोन्ही पद्धतीत मुख्य फरक आहे तो हा कों, नवे हक रक्षण केलेल्या जंगलांत उत्पन्न करता येईल, परंतु राखलेले जंगलांत नवीन हक उत्पन्न करता येणार नाहींत. २ या बाबीत सांगितल्याप्रमाणे तयार करून ठेविलेल्या हक्कांचा दाख- ला निश्चयात्मक नसतो आणि ४ थे वाचीत सांगितल्यप्रमाणे जो हकाचा दाखला ठेवलेला असतो त्याजवरून त्याचे खरेपणाबद्दल मात्र अनुमान करतां चेते. ज्या ठिकाणी हक्क नियमित करण्याचा हेतु, ते अधिक फायदेशीर रीतीने बालवितां यावे हा असून, लोकांचे हित साधण्यासाठी त्यांचा दुरुपयोग व्हावा असा नसतो, त्या ठिकाणी या अनुमानापासून पुष्कळच बचाव होतो अशी सम- जत आहे. लोकांच्या संबंधाने पाहिले तर या दोन पद्धतीत मुख्य भेद आहे तो हो की, स्थूल मानाने विचार केला असतां राखून ठेविलेल्या जंगलांत जी जी क्रिया परवानगी घेतल्याशिवाय केली जाते ती ती क्रिया गुन्हे असे समजले जातें; आणि संरक्षण केलेल्या जंगलांत जीबद्दल मनाई नाही अशी कोणतीही क्रिया केली असतां ती गुन्हा होत नाही. या दोन्ही वावतीत जीवरून एक- सारखाच परिणाम घडून येईल, असे प्रकारे त्या परवानगीची आणि मनाईची व्यवस्था लावितां येण्याचा संभव आहे असा तर्क करितां येईल; परंत व्यवहार- दृष्टीने तसे करणे अगदी असंभवनीय आहे. असें जर नसते तर कायदे करणा- या मडगने या दोहों पद्धतीमध्ये जो फरक काढिला आहे तो व्यर्थ व निरर्थक सर्वसाधारण लोकांच्या ज्या हिताकरितां जास्त सक्त रीत लागू करणे व जंगलाचे गुन्ह्याची अधिक व्यापक व्याख्या करणे वाजवी होईल अशा प्रकारे तें हित मोट्या महत्वाचे असेल त्या वेळेस मात्र दुसऱ्या पद्धतीची योजना करावी मगन गव्हरनर-जनरल-इन-कौन्सिल यांची अशी इच्छा आहे की, सर्पण व वैरण यांकरितां रक्षण करून ठेविलेल्या जमिनी व निवळ व निखालस गुरें चारणीच्या जमिना आणि मुख्यत्वेकरून त्या जमिनीपैकी ज्या लागवड केलेल्या प्रदेशांमध्ये असतात त्या जमिनी, अशा जमिनींविषयी विचार करितांना प्रत्येक जमीन जंगलाच्या कोणत्या वर्गात दाखल करणे अवश्य आहे अथवा त्या जमि- नी कोण या वर्गात दाखल कराव्या हे जर पूर्वीच ठरविले असेल, तर त्या रा- खून ठेवलेल्या जंगली क्षेत्राप्रमाणे ठेवाव्या किंवा नाही, याचा विचार केला पा- हिजे आणि ह्या प्रश्नाचा निकाल, जर असे करणे वाजवी आहे असा झाला तर, ह्या जमिनी राखून ठेवलेली जंगले आहेत असें ह्मणण्यापेक्षा ती रक्षण केलेली जंगले आहेत असे मानणे विशेष चांगले होईल किंवा नाही हेही पाहिले पाहिजे. १६. ही वर सांगितलेली सामान्य तत्वें ब्रिटिश हिंदुस्थानांतील सर्व सरकारी झाला असता.