पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५५) व्यवस्था लावतां येईल. जमिनी खंडाने द्यावयाच्या त्यांबद्दल जो जबर खंडे लोक नुकत्याच सांगितलेल्या अडचणीपासून बचाव होण्याकरितां देण्यास तयार असतात तो घेऊन देऊं नयेत, परंतु ज्या जमिनीबद्दल सरकारांत सारा द्यावा लागतो त्या जमिनीची चांगली लागवड होण्याकरितां चरणारे गुरांचे व मेंढरांचे कळप अवश्य लागतात व त्यांच्या चारणीची तजवीज केल्यावांचून ते जगणार नाहीत, ही गोष्ट मनांत आणून व माफक अंदाज करून त्या मानानें जो खंड घ्यावयाचा त्याचा आकार ठरवावा. जी शेते लोकांनी सोडून दिली असतील ती कमी पट्टी घेऊन गुरे चारणीच्या कामाकरितां बाहेरच्या लोकांस कधी देऊ नयेत ; कारण असे केल्याने सदहू शेत, उलाढाली करणारे लोक अतिक्रमण करणाऱ्या गुरांपासून जितका फायदा करून घेता येईल तितका मिळविण्याच्या मुख्य हेतूनें कमी पट्टी देऊन सहज घेतील. १५. मूळ तत्वाच्या आणखी एका मुद्याचा विचार करण्याचे राहिले आहे. जंगले रक्षण केलेली आहेत असें जाहिरनामा लावून प्रसिद्ध करण्याविषयीं जी रीत हिंदुस्थानच्या जंगलाचे कायद्याचे ४ थे वावीत सांगितली आहे ती रीत हिंदुस्थानसरकाराने काही बाबतींत चालचलाऊ व मध्यंतरींची अशी मानली आहे; आणि रक्षण केलेल्या जंगलांतील किती क्षेत्र जंगलाच्या कायद्याच्या २ या बाबीअन्वयें राखलेले जंगल ह्मणून ठेवावे आणि बाकी राहिलेलें अजि- वात सोडून द्यावें, याचा विचार व निकाल करण्यास फुरसत सांपडावी हाच असें करण्याचा मुख्य हेतु आहे. जंगलाच्या कायद्यामध्ये दोन पद्धति निरनि- राळ्या सांगितल्या आहेत. बाब २ हीत जी जास्त सक्त पद्धत सांगितली आहे तिच्या योगाने हल्लींचे हक्क निश्चित करता येतील, दुसऱ्यास देतां येतील किंवा बदल करितां येतील आणि ही पद्धत या ठरावाच्या ३ या कलमांत पहिल्या व दुसऱ्या वर्गाची जी जंगलें सांगितली आहेत त्यांस सामान्यतः लागू पडेल. चवथे बाबतींत जी पद्धत सांगितली आहे तिच्या योगानें हक्क दप्तरी दाखल करितां येतात व नियमित करतां येतात आणि ज्या प्रसंगी क्षेत्रास लाग असणारे हक मोठे असतात व ज्या प्रसंगी जंगलांची व्यवस्था तेथील लोकांच्या फायद्यासाठी मुख्यत्वेकरून करावयाची असते त्या प्रसंगी ही पद्धत नेहमी बरोबर लागू करता येईल. साधारणतः ही पद्धत ३ या व ४ थ्या वर्गाच्या जंगलांना लागू पडेल. ही दुसरी पद्धत वास्तविक चालचलाऊ असून ती बाब २ यांत जंगले राखण्याबद्दल सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी- वरून तीस बाध नाही. सरकारासंबंधाने पाहिले तर वर सांगितलेल्या