पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५४) त्यापासून दुरुपयोग होतो, असे हिंदुस्थानसरकारचे स्पष्ट मत आहे. जंगलखा- त्यांतील हलक्या प्रतीचे नोकर हे आपणास जो लांना पगार देतां येतो त्या मानाने विश्वासू असावे तितके कदाचित् असतील, परंतु त्यांची नीति ते ज्या अशिक्षित वर्गातून आले असतात त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ नसते, आणि ज्या प्रदेशत कामें करतात ते प्रदेश विस्तीर्ण असल्यामुळे व त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या अंमलदारांची संख्या फारच थोडी असल्यामुळे त्यांजवर चांगली देखरेख ठेवण्याचे काम फारच कठीण पडते. लागवड जमिनीच्या आसपास फैलावलेल्या पडित जमिनीवरील चारा अथवा चारणीचे उत्पन्न राखण्याच्या उद्देशानें, गुरे आपल्या मालकांच्या शेताची हद्द ओलांडून जवळच्या दुसऱ्या शेतांत गेली तर त्यांना कोंडवाड्यांत घालण्याची दहशत दाखविण्याचा अधि- कार हलक्या प्रतीच्या नोकराच्या हातांत देणे अगदों गैरशिस्त आहे. जंगला- च्या कायद्याचे कलम ६७ यांत गुन्हे मोडून टाकण्याकरितां दिलेला अधिकार हलक्या प्रतीच्या नोकराने केलेल्या रिपोर्टावरून चालवू देणे अथवा या अधेि- कारापासून उत्पन्न होणाऱ्या लालचीस त्यांस पात्र करणे ही गोष्ट वरील गोष्टीं- पेक्षां तर फारच गैरशिस्त आहे. ज्या ठिकाणी फायद्याची बाब बरीच महत्वाची असते त्या ठिकाणी हलके नौकर लोक लोकांपासून जुलमाने पैसे घेतील अशी जरी भीति असली तरी ती पत्करणे कदाचित् जरूर होईल. पण असे जुलमाने पैसे काढण्याचे प्रसंग अगदी कमी करता येतील अशी तजवीज करावी. ज्या बाबतीबद्दल विचार चालू आहे त्यांत होणारे हित फारच थोडे असून जुलूम करण्याचे प्रसंग अतोनात येणारे आहेत. १४. गुरे चरणीची वाव ही मुख्यत्वेकरून उत्पन्नाची बाब आहे, अशी हिंदु- स्थानसरकारची इच्छा नाही हे पकेपणी लक्षात ठेविले पाहिजे; परंतु यावरून ठिकठिकाणी पसरलेल्या ज्या सरकारी जमिनी आहेत, त्यांचे उत्पन्न सोड- ग्यास सरकार तयार आहे असे मात्र कोणी समजू नये. असे करणे खरोखर इष्ट नाही ; कारण असे केले असतां जमिनी लागवडी वगैरे करतां लावून देण्याचे कामांत हरकती आणण्यास व जमिनीची नवीन वहिवाट करणारांस पीडा करण्यास रयतेस सवड होईल ; परंतु त्या जमिनीची व्यवस्था तेथे रहा- णा-या लागवड करणारांकडे अगर त्यांपैकी मुखत्यारांकडे दिली असतां, साक्षात् सरकारतर्फे वहिवाट करण्यास ज्या हरकती येतात ह्मणून नुकतेच सांगितले आहे त्या पुष्कळच कमी होतील. गांवच्या लोकांच्या मार्फत गांवच्या रिका- म्या पडलेल्या जमिनी खंडाने बहुधा देतां येतील, अथवा दुसऱ्या त-हेने त्यांची