पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १० ) बरेच दिवस गुजराथेंतील काही ठिकाणचे वखारीशिवाय तिजकडे जास्त प्रांत न- व्हता. सन १६६८ साली तिजला दुसऱ्या चार्लस राजाने मुंबई शहर व बेट विकत दिले व या टापूस १७०८ साली इलाखा हे नाव देण्यांत आले; तरी त्याचे हद्दीस मुंबई बेटाशिवाय जास्त भाग नव्हता. नंतर मराठ्यांकडून गुजराथ व १८१७ साली पेशव्यांचे राज्य लयास गेल्यावर दक्षिण प्रांत प्राप्त झाला व कांहीं प्रांत शिंद्याबरोबर अदलाबदल करून आला. सिंध प्रांत १८४३ साली जिंक- ण्यांत आला. एडन बंदर १८३९ साली घेण्यात आले व सोमाली किनारा व सक्रोत्रा येथे प्रोटेक्टोरेट स्थापण्यांत आले. दक्षिणप्रांताचा मध्यभाग “दुष्काळी प्रांत" आहे, तेथे पाऊस पडणे फार अनिश्चित आहे. याच प्रांतांत १८७६७७ सालचा मोठा दुष्काळ पडला होता. कोंकणांत पाऊस पुष्कळ पडतो परंतु तेथील जमीन खडकाळ आहे, सुपीक नाही. गुजराथेत पाऊस फार कमी पडतो तरी उत्पन्नाचे मानाने त्याच प्रांताचा पहिला नंबर लागेल. सिंध प्रांतांत किनाऱ्याचे भाग व पूर्वबाजूचा काही भाग असे शिवायकरून बाकीचे भागांत पाऊस मुळीच पडत नाही. सिंधु नदीस पूर येतात त्यांचे योगाने व कालवे काढले आहेत त्यांपासून उत्पन्न होतें व लागवड सर्व नदीचे व कालव्यांचे कांटचे प्रांतांतच आहे. ह्या इलाख्याचे सर्व भाग एकास एक लागून नाहीत. सिंध प्रांत मुंबई- इलाख्यापैकी इंग्रजीतील मुलखास सुटून आहे, एडन तर १६६० मैल लांब आहे व तेथून पेरिम आणखी शंभर मैल लांब आहे. सकोत्रा, गारडाफुईचे भूशलाकेजवळ व झैला, बरबेरा व वुल्हार ही तर आफ्रिका खंडांत आहेत. बंगाल -या इलाख्यांत खरा बंगाल प्रांत व बिहार व ओरिसा हे व छोटा नागपूर व दार्जिलिंगजवळील घाटी प्रदेश हे येतात. पहिल्या तीन प्रांतांची दि- वाणी मोगलांकडून ईस्ट इंडिया कंपनीस मिळाली त्या वेळी ओरिसा व बहुतेक छोटा नागपूर हे प्रांत मराठ्यांचे अमलाखाली होते व दाजिलिंग हा सिकिमकडे होता. ओरिसा प्रांत सन १८०० साली व पुढे १०।१५ वर्षांनी छोटा नागपूर हे प्रांत मिळाले. दाजिलिंग १८३५ सांत आले व त्याखालील प्रांत १५।२० वर्षांत हाती आला. या प्रांताचा कारभार गव्हरनर जनरलच सन १८३४ पर्यंत पाहात आले. त्या साली बंगालचे गव्हरनर-जनरल सर्व हिंदुस्थानचे मुख्याधिपति झाले व बंगाल इलाखा त्यांचेच हाताखाली परंतु वेगळा झाला. या प्रांतास स्वतंत्र ले- फ्टनेंट गव्हरनर सन १८५४ साली नेमण्यांत आला. बंगालइलाख्यांतील ओरिसा प्रांत व बिहारचा वायव्य प्रांत हे “ दुष्काळी मुलखांत" येतात; इतर