पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५२) थोडा फायदा होईल. हिंदुस्थानांतील लोकांच्या रीतिभाति हळू हळू बदलत असतात, आणि लोकांचा जेणेकरून फायदा होईल अशा पुष्कळ गोष्टी करितां येती अथवा त्या करणे वाजवी होईल, तरी, जे करणे असेल ते एकदम न करितां धिम्मधिम्में व क्रमाक्रमाने केले पाहिजे; कारण त्याच्या भौतिक फायद्याकडे लक्ष देण्यापेक्षा जेणेकरून त्याचे समाधान होईल अशी गोष्ट करणे कमी महत्वाचे नाही. राखलेल्या जंगलांत गुरे चारणीकरितां वेगळे क्षेत्र काढून टेविल्याने, वर सांगितलेल्या राखलेल्या जंगलांत आसपास राहणा-या लोकांचा फायदा व्हावा हा हेतु आहे, ही गाष्ट देखील ध्यानात ठेविली पाहिजे, आणि गुरे चारणी- पासून हल्लों होणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न व्हावे ह्मणून रानांत उत्पन्न होणारे जिन्नस राखलेल्या जंगलापासून दूरदूरच्या अंतरांवरील मोठमे ट्या शह- रांच्या खर्चाकरितां, जो कोणी अधिक किंमत देईल, त्यास व फक्त विकून जास्त उत्पन्न करणे, ही गोष्ट हिंदुस्थानसरकाराने जी व्यवस्था ठेवावी झणून वर सांगितले आहे, त्या व्यवस्थेस नेहमी अनुसरून असते असे नाही. पुनः या ठिकाणी देखील जशी वस्तुस्थिति असेल तसा निकाल केला पाहिजे. राखलेल्या क्षेत्रांशिवाय इतर क्षेत्रांतून ठिकठिकाणचा सर्पणाचा व वैरणीचा पुरवठा सामा- न्य वर्षांत ( ज्या वर्षांत दुष्काळ वगैरे नसतो अशा वर्षांत ) आसपास राहणा- या लोकांच्या गरजा भागविण्यापुरता कोठे कोठे मात्र असतो. अशी गोष्ट असेल तेव्हां अशा सालांत जंगलांतील पाल जास्त फायदा होईल अशा रीतीने विकतां येईल; आणि बाहेरच्या मालाचा पुरवठा कमी पडत असेल तेव्हांच मात्र जगलांतील माल या ठिकाणच्या खपाकरितां राखून ठेवावा. शेवटी असें सांगणे आहे की, या ठरावाच्या १२ वे कलमांत एजन्सी ( जंगलाची व्यवस्था पहाग्या करितां सरकाराने नेमलेले कामगार ) विषयों में सांगितले आहे ते, आणि त्याचे पुढील १३ वे कलमांत ज्या सामान्य विचाराविषयी उहापोह केला आहे त विचार, हे सर्पणाचा व वैरणीचा वगेरे पुरवठा करण्याकरितां सदरी लिहिल्याप्रमाणे राखून ठेविलेल्या क्षेत्रांस पूर्णपणे लागू आहेत. १२. गरें चारणीच्या आणि नुसया कुरणाच्या जागा ही चवथ्या वर्गाची जंगले होत. ही वहधा नांवाचींच राने असतात असें झटले तरी चालेल. अशा प्रकारच्या जमिनीवर, एका बाजूस सरकार व दुसऱ्या बाजूस खासगी लोक अथवा गावांतील लोक, यांचे दरम्यान हक्क असतात त्यांजवद्दल कायदेशीर निर्णय करून घेण्यासाठी ह्या जमिनी जंगले आहेत असें ठरविणे नेहमी सोईचे असते; परंतु एवढ्यावरून ह्या जमिनीस जंगलखात्याची जंगले राखण्याची जी