पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२५१) गुरे चारणीबद्दलची मागणी केली असतां ती एक अगर जास्त वर्षांच्या मुदतीने ठरवून देणे हे नेहमी फायदेशीर होईल. इतर पद्धतीप्रमाणे ह्या पद्धतीतही काही विशेष अडचणी आहेत, परंतु या पद्धतीच्या योगाने हलक्या प्रकारच्या नोकर लोकांस फारच थोडा हात घालता येईल, आणि लोकांवर जुलूम करण्याचे व त्यांजपासून जबरीने पैसे घेण्याचे जे त्यांस प्रसंग येतात ते फारच थोडे येतील. ज्या ठिकाणी गुरे चारणीबद्दलची फी प्रत्येक व्यक्तीपासून घेण्यांत येते त्या ठिकाणी काही गुरें मोफत चरू देण्याची वहिवाट असते. अशा बाबतीत जी गुरे मोफत चरू द्यावयाची ती, नांगरणीचे कामास प्रत्यक्ष उपयोगास लाव- लेले बैलच असले पाहिजेत असे नाही, तर दुभती गुरे व वासरें वेताची अस- ल्यास त्यांसही मोफत चढू द्यावे. शेतकऱ्यांस नांगराचे वैलाची जितकी अवश्य- कता (अवश्यकता हा शब्द वाजवी व्यापक अर्थाने येथे योजिला आहे) अस- ते, तितकीच गाईची अथवा रशींची असते आणि पुष्कळ ठिकाणी खेडेगांवांतून बैल पाळून वाढविण्याची चाल असते. ११. या ठरावाच्या मथळ्यांत डाक्टर व्होलकर यांच्या ज्या रिपोर्टाचा उल्लेख केला आहे त्यांत काही ठिकाणी सर्पणाकरितां व वैरणीकरितां जागा राखून ठेवण्याविषयी त्यांनी आग्रहपूर्वक शिफारस केली आहे आणि हिंदुस्थानसर- कार अशा प्रकारची व्यवस्था करण्याविषयी स्थानिक सरकारांस वारंवार कळवीत आलेच आहे. कोणत्याही एखाद्या क्षेत्रांतून गवत राखून तें वैरणीकरितां कापून ठेविलें तर त्या क्षेत्रांत हल्लीपेक्षा जास्त गुरांचे पोषण होईल, अथवा त्यो क्षेत्रांत गुरे चरण्याची परवानगी दिल्याने हल्लीपेक्षा जास्त गुरांचे पोषण होईल, या प्रश्नाचा निकाल करणे तो ज्या ठिकाणी जशी स्थिति असेल त्या स्थितीच्या मानाने त्या ठिकाणी केला पाहिजे. परंतु सदरी लिहिलेल्या प्रश्नाचा एकदां निकाल केला, ह्मणजे यासंबंधी सर्व बावतींचा निकाल झालाच, असे मात्र कोणी समजू नये. " लोकांचा पुष्कळ फायदा व हित होईल अशा रतिीने" सर्पण व वैरण यांचा पुरवठा व्हावा, असा किरकोळ जंगलाची व्यवस्था कर- ण्याचा एक मुख्य हेतु आहे ह्मणून वर नवव्या कलमांत सांगितले आहे. असे करतांना लोकांच्या रीतिभाति वे इच्छा यांजकडे योग्य लक्ष पुरविले पाहिजे. जंगलें सक्त रीतीने राखल्याने आणि ती काही नुदतपर्यंत बंद ठेवल्याने अथवा त्यांत गुरे चरण्याची अगदी मनाई केल्याने सर्पणाचा व वाळलेल्या गवताचा पुष्कळ पुरवठा होण्याचा संभव आहे. परंतु अशा प्रकारे जास्त केलेल्या पुरव- वव्याचा लोक जर उपयोग करून घेणार नाहीत, तर तसे करण्यापासून फारच