पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.. करावा. ( २५० ) पुरवठा करण्याचे कामी मुख्यत्वेकरून उपयोगी पडतात त्या जंगलांविषयी आ- तां आपणास विचार करावयाचा आहे; आणि अशा जंगलांची व्यवस्था करणे ती त्यांच्या आसपास जे लोक राहतात व ज्यांस त्या जंगलांपासून जंगलांतील जिनसांचा पुरवठा होतो, त्यांचे हित होईल अशा प्रकारे केली पाहिजे. वहिवाट करणारांस जंगलांतील मालाचा समूळ नाश करितां येऊ नये, आणि लोक स्वतः अविचाराने वागल्यामुळे जे त्यांचे नुकसान होणार त्यापासून त्यांचे रक्षण केलें पाहिजे, याकरितां ह्या जंगलांतील झाडे आणि गवत ही राखून ठेविली पाहिजेत, ही पहिली गोष्ट ; आणि लोकांचा पुष्कळ फायदा व सोय होईल अशा रीतीने जंग- लांतील उत्पन्न होणाऱ्या जिनसांचा त्यांस पुरवठा केला पाहिजे, ही दुसरी गोष्ट; ह्या दोन गोष्टी पुन्या झाल्यानंतर मग सरकारमहसुलाबद्दल विचार करणें तो १०. पूर्वी सांगितलेल्या गोष्टीवरून ज्या मोठमोठ्या क्षेत्रांपासून मुख्यत्वेकरून किंमतदार वैरण आणि सर्पण पैदा होते त्यांजपासून होणारे उत्पन्न सोडून दे- ण्याचा हिंदुस्थानसरकारचा हेतु आहे असें कोणा समजू नये. अशा प्रकारच्या जंगलाचे अनेक प्रकार आहेत. सदई जंगलांतील अगर त्यांचे सभोवती अम- णान्या ज्या खेड्यांतील लोकांस गुरे चारणीकरितां आणि सर्पण मिळण्याकरितां त्या जंगलाशिवाय दुसरे मार्ग नाहीत, त्या खड्यांतील राहणारे लोकांच्या गरजा अतिमहत्वाच्या आहेत असे मानले पाहिजे ; आणि त्या गरजा फारच माफक दराने आणि होईल तितकें करून सरकारी अंमलदारांकडून हरकत न होतां पुरविल्या पाहिजेत; परंतु ज्या प्रदेशांत खेड्यांतील लोकांस त्याच्या लागवडी- च्या जमिनीस लागून अशा पुष्कळच गुरे चारणीच्या जागा आहेत व ज्यांज- वर त्यांची मालकी असून ज्यांची व्यवस्था ते स्वत: पहात आहेत, आणि जेथें या गुरे चारणीशिवाय सरकारी जमीन पुरवणीदाखल असन ज्या भटकणाऱ्या धनगर लोकांस मेंढ्या चारण्यास अथवा जसजसे ऋतु बदलतात तसतशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या गुरांस चरण्यास उपयोगी पडतात, अशा प्रदेशांत सरकाराने आपल्या मिळकतीपासून वाजवी उत्पन्न करून घेतल्यास गैरशिस्त होणार नाही. अशा ठिकाणी देखील गुरे चारणान्या लोकांची सोय व फायदा यांविषयी विशेष विचार केला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांपासून अगर तेथें हमेशा गुरे चारणीबद्दल पैसे घ्यावयाचे ते उघड बाजा- रांत जे दर असतील त्यापेक्षा बरेच कमी घ्यावे व त्यांनाच ती रानें गुरे चार- णीस द्यावी. खड्यांत राहणारे लोकांनी अगर कळप घेऊन फिरणाऱ्या लोकांनी