पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४६) गोर अगदी उघड होते की, अशा प्रकारे जंगलांचे संरक्षण करणे ह्मणजे खासगी हक्कांचे थोडेफार नियमन करणे होय; परंतु संरक्षणापासून होणारे फायदे व नियमनापासून होणारे नुकसान यांत महदंतर आहे. यासाठी जोपर्यंत नियम- न केल्यापासून खरोखर प्रत्यक्ष फायदा होण्याजोगा आहे तोपर्यंत अल्प नुकसा- नांचे वाधीकडे बिलकुल लक्ष देता कामा नये. ५. दुसऱ्या प्रतीची जंगले पटली ह्मणजे ज्या विस्तीर्ण प्रदेशापासून आपणास साग, साळ, देवदार व अशाच प्रकारच्या मौल्यवान लांकडाचा पुरवठा होतो, ती जंगले होत. हे प्रदेश सर्वथैव नव्हे तरी बहुतकरून वस्तुतः जंगली प्रदे- शच असतात. यामुळे अशा जंगलावर खासगी वहिवाटीचे हक्क फारच संकुचित असतात. अशी जेव्हां स्थिति असते तेव्हां ही जंगले सरकारची मोठी मौल्यवान मिळकत आहे व सरकारमहसुलाची साधने आहेत असे समजून त्यांची व्यवस्था मुख्यत्वेकरून व्यापारदृष्टीने केली पाहिजे. शिवाय अशा बाबतींत देखील जंगलाचा उपभोग घेण्याची वहिवाट जंगलाच्या समिवर जे प्रदेश असतात त्यांत रहाणारे लोकांचीच मात्र बहुतकरून झाली असते. ज्या लोकांची अशी वहिवाट असेल त्या लोकांची अर्जितदशा होण्यास तशी वहिवाट त्यांस नेहमीं करूं देणे अगदी अवश्य आहे, आणि ज्याअर्थी हे वहिवाटीचे हक्क एकंदर जंगलाच्या खोऱ्याच्या मानाने फारच अल्प असे असतात त्याअर्थी ते जशाचे तसे चालू ठेवल्याने फारशी गैरसोय होण्यासारखी नाही. जंगलाच्या हद्दीवर रहाणारे लोकांस मुख्यत्वेकरून ज्या पदार्थांची फारच गरज लागते ते पदार्थ मटले ह्मणजे इमारतीकरितां लहानसहान लांकडे, जळणाकरितां सर्पण, खताकरितां व वैरणीकरितां राने, कुंपणाकरितां कांटी, गुराढोरांकरितां गवत व चराऊ राने व स्वतःचे उपयोगाकरितां जंगलांत उत्पन्न होणारे खाद्य पदार्थ हे होत. मग हे पदार्थ (ज्या ठिकाणी जंगलांतील लांकडांची तोड करण्याची वहिवाट सुरू केली आहे ) जरी अगदी मोफत देण्याची सवड झाली नाही तरी होतां होईल तितक्या माफक दराने ते दिले पाहिजेत. अशा प्रसंगी चढाओ- ढीचे दर विलकुल लावतां कामा नये. एकंदरीत ही गोष्ट लक्षांत वागविली पाहिजे की, अशा ठिकाणी उत्पन्नाच्या वावीस मुख्य स्थळ न देतां तें स्थल लोकांचे सोईस दिले पाहिजे. मौल्यवान इमारती लाकडांची लागवड होण्यालायक ह्मणून बरेंच जमिनीनें क्षेत्र हल्ली राखून ठेविलें आहे, परंतु हे सर्व क्षेत्र सदर लाकडांच्या लागवडी- जोगे आहे असे नाही. यासंबंधाने केलेला अंदाज चुकीचा आहे असें मान-