पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४५) वंदोबस्त ठेविला असतां अथातच त्या जंगलांच्या अगदों आसपास राहणार लोकांचे पूर्वापार चालत आलेले हक्क व त्यांच्या वाहेवाटी यांचे थोडेबहुत तरी नियमन करण्याची अव यकता उत्पन्न होते. तथापे अशा प्रकारचे नियमन केल्याने अगर मर्यादा ठरविल्याने जर लोकांचा मोठा फायदा होण्याचा संभव असेल तरच असें करणें निर्दोष होईल. अशा कामों नेहमी हे मुख्य तत्व लक्षात वागविले पाहिजे की, जेथें व्यक्तिविषयक हिताकडे लक्ष न देतां उलट त्याचे हक्काचे व अधिकाराचे जेथें नियमन करण्याचा प्रसंग येईल तेथें सार्वजनिक हित साधण्यासाठी जितकी अवश्यकता जरूर असेल तितक्याच मानाने व्यक्तीचे हक्क व अधिकार यांचे नियमन केले पाहिजे. ३. हिंदुस्थानची जंगले ही सरकारी मालकीची आहेत मगून त्यांचे स्थूल मानानें खाली लिहिल्याप्रमाणे वर्ग केले आहेत:- अ. ज्यांचे रक्षण, हवा चांगली राहावी ह्मणून अगर स्थलविशेषाचे कारणा- मुळे अवश्य आहे अशी रानें. व. ज्यांत उपयोगी पडणारी मौल्यवान इमारती लांकडे उत्पन्न होतात ती जंगलें. क. लहानसहान जंगलें. ड. गुरेंचराईची कुरणे. वर निदिष्ट केलेल्या वांपैकी कोणत्या तरी प्रकारच्या वर्गात हलींच्या सर- कारी जंगलाचा समावेश करून त्यांचे वर्ग करण्याची योजना करावी असा या ठरावाचा हेतु नाही. काही जंगले वर सांगितलेल्या वर्गाचे मिश्रण झालेली असतील आणि एकाच जंगलाचे भाग निरनिराळ्या सदरात येऊ शकतील. जंगलाच्या प्रत्येक वर्गाची व्यवस्था अनुक्रमें कोणत्या तहेने लावावी, याविषयी सर्व साधारण व्यवस्थेचे दिग्दर्शन करण्यासाठी मात्र सदई वर्गीकरणापासून उपयोग आहे ; आणि ही साधारण व्यवस्था कोठे व कशी लागू करावयाची हे ठिकठिकाणची हवाल पाहून ठरविले पाहिजे. ४. पहिल्या प्रकारची जंगलें बहुतकरून डोंगरांच्या उतरंडीवर असतात. या उतरंडीवरून येणाऱ्या पाण्याच्या लोटांनी त्यांच्या पायथ्याशी असलेली लागवड जमीन दिवसेंदिवस अगदी वाहन जाण्याची मोठी भीति असते. अशा प्रकारे जमिनीचा नाश होऊं नये ह्मणून डोंगरांच्या उतरंडीवर असलेल्या झाड- झाडोयांचे संरक्षण केले पाहिजे; एवढेच नाही, तर तसा झाडझाडोरा जिकडून जास्त वाढेल असा बंदोबस्त ठेवणे अत्यवश्यक आहे. यावरून ही