पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

--सन १८९४-९५रु. १६४६०००० १८९४-९५ रु. ९८४४००० ( अंदाज.)

  • वन्हाडचे उत्पन्न व खर्च यांत आली नाहीत.

जंगलाची व्यवस्था कोणते तत्वांवर चालावी यासंबंधाने हिंदुस्थानसरका- रांनी फार महत्वाचा ठराव नुसताच प्रसिद्ध केला आहे तो खाली देतो. पुण्याच्या सार्वजनिक सभेने त्या ठरावाचे भाषांतर करवन प्रसिद्ध केले आहे तेच येथे दिले आहे. हिंदुस्थान सरकारचा जंगल वासासंबंधाचा साग्र ठराव. हिंदुस्थानातील शेतकीची सुधारणा, याविषयी डाक्टर व्होलकर यांनी जो रिपोर्ट केला आहे, त्याचे आठवे भागांत जंगलखात्याच्या व्यवस्थेपासून शेत- कीचे कामास हल्ली जितकी प्रत्यक्ष मदत मिळत आहे त्यापक्षां जेणेकरून जास्त मदत होत जाईल अशाच गतीने जंगलखात्याचे व्यवस्थेस वळण देणे ही किती महत्वाची गोट आहे, याविषयी त्यांनी सविस्तर वर्णन केले आहे. जंगल वात्याचे इन्स्पेक्टर जनरल यांनी, सन १८९२।९३ सालच्या जगलखात्याचे व्यवस्थेसंबंधाने केलल्या गुणदोषविवेचनांत ब्रिटिश सरकारच्या ताव्यांतील सरकारी जंगलांची व्यवस्था कोणत्या धर्तीवर चालवावी, याविषयी बराच तपशीलवार उहापोह केला आहे. जंगलखात्याचे इन्स्पेक्टर-जनरल यांनी ज्या तत्वांचा उल्लेख केला आहे, ती हिंदुस्थानसरकारास बहुतेक मान्य आहेत. तरी या बाबतीत ज्या प्रकारची सामान्यतः व्यवस्था राहिली पाहिजे ह्मणून हिंदुस्थानसरकारची इच्छा आहे, ती येथे सांगितली असतां विशेष उपयोग होईल असे वाटल्यावरून तिचा उल्लेख या ठिकाणी केला आहे असा उल्लेख करण्याचे आणखी विशेष कारण असे आहे की, जंगलखात्याच्या व्यवस्थेसंबंधाने सरकारचे जे उद्देश आहेत त्या उद्देशांबद्दल गैरसमज झाल्याची अलीकडे बरीच उदाहरणे सरकारास आ- ढळून आलेली आहेत. २. सरकारी जंगलाची व्यवस्था राखण्याचा मुख्य हेतु लोकांचे हित व्हावें हा होय. काही प्रसंगी जेणेकरून एकंदर सर्व कर देणारे लोकांचे हित होईल अशी व्यवस्था राहिली पाहिजे व अन्य प्रसंगी ज्या प्रदेशांत जंगले असतील त्या प्रदेशांत राहणारे लोकांचेच जणेकरून हित होईल अशी व्यवस्था राहिली पाहिजे ; परंतु बहुतेक प्रसंगी सार्वजनिक हित साधण्याचे हेतूनें जंगलाचा