पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जिक नियमही व्यापारवृद्धीस प्रतिकूळ आहेत यामुळे दुष्काळाचा परिणाम देशा- वर जास्त जरब होतो. प्रजावृद्धीचे कामास हरकती आणणाऱ्या कारणांचा अंमल यापुढे कमी हो- ग्याचा संभव आहे. वैद्यकीचे ज्ञानाचे वृद्धीपासून रोगोपशम होईल व देवी काढविण्याचा प्रचार वाढल्यामुळे देवीपासून होणारे मृत्यूंची संख्या बरीच कमी झाली आहे. पटकीची सांथ उद्भवण्याचें बंद करण्याचा उपाय जरी सांपडला नाहीं तरी तिचा फैलाव आतां पूर्वीपेक्षा कमी होतो व त्यापासून तिचे भक्ष्य- स्थानी पडणारांची संख्याही काही कमी होत जात आहे. गांवगन्ना आरोग्य वाढविण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. देशपर्यटनाचे मार्ग सुधारल्याने व दळणवळणास साधने जास्त झाल्याने, कृत्रिम उपयांनी उदकसंचय करून वागाईत वाढल्याने, तसेंच दुष्काळाचे शमनाप्रीत्यर्थ उपायांची तयारी करून ठेवली असल्यामुळे आतां दुष्काळापासून पूर्वीप्रमाणे भयंकर परिणाम होण्याचा संभव कमी आहे. एकंदरीत पुढे जनसंख्या वाढण्यास व मृत्यूची संख्या कमी होण्यास अनुकूल असा काल दिवसेंदिवस येत आहे असे अनुमान केल्यास चुकी- चें होईल असे वाटत नाही. स्थानिक सरकारांचे ताब्यांत जे प्रांत आहेत त्यांसंबंधानें थोडी हकीकत सांगून हा भाग संपविण्याचा विचार आहे. मद्रास इलाख्यांत अग्रमान मद्रास इलाख्याचा आहे व तो इलाखा प्राप्त- ही पहिल्याने झाला. हल्ली फोर्टसेंट जार्ज आहे ते ठिकाण ईस्ट इंडिया कंपनीने १६३९ साली खरेदी केले व त्यापुढे तिने शंभर वर्षे आणखी काही मुलुख मिळ- विला नव्हता. नंतर मच्छलीपट्टण फ्रेंचांकडून घेतलें, सरकार प्रांत मोगलांकडून संपादन करण्यांत आला, टिपुसुलतानांचा पराभव झाल्यावर मलवार किनारा, सालेम व कोईमतूर प्रांत हे मिळाले व बलारी व कडापा निझामाने दिले; तंजा- वर व कर्नाटक त्यानंतर एक दोन वर्षांनी प्राप्त झाले व १८३८ साली करनूल संपादन झाल्यावर या इलाख्याची वाढ पूर्ण झाली. लाकादवि बेटे सोडून या इला- ख्याचे प्रांत सर्व एके ठिकाणी आहेत. पश्चिम किनाऱ्याचे प्रांत, दक्षिण भाग व डोंगरी प्रांत हे शिवायकरून बाकीचे प्रदेशांत पावसाचा तोटा येतो. उत्तरेकडील भाग “ दुष्काळी प्रांतांत” पूर्ण येतात. या इलाख्यांत असलेला कारवार जिल्हा मुंबई इलाख्यास १८६२ साली जोडला व एक लहानसें खेडे १८८४ साली बंगाल इलाख्यात सामील करण्यांत आले. मुंबई-मुंबई इलाख्यांतही वऱ्याच काळा पूर्वीपासून कंपनीची वस्ती होती. कंपनीची हिंदुस्थानांतील पहिली वखार सन १६१३ साली स्थापन झाली व पुढे