पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२४०) वर व प्रांतांतील जंगलाचे स्थितीचा अनुभव आल्यावर त्यांस कामावर पाठवि- ण्यांत येते. खालचे दर्जाचे नौकर लोक तयार करण्यासाठी सन १८७८ साली देहरादुन येथे एक शाळा स्थापन करण्यात आली. तींत वनस्पतिशास्त्र, ख- निजपदार्थांचे ज्ञान, मोजणी करणे, गणित व पदार्थविज्ञानशास्त्र हे शास्त्राय विषय शिकवून शिवाय वहिवाटीच्या गोष्टीही शिकविण्यांत येतात. या शाळेचे व हल्ली जंगलाचे संबंधाने व्यवस्था करण्यांत आली आहे तिचे उत्पादक सर डी. ब्रांडिस हिंदुस्थानचे माजी इन्स्पेक्टर जनरल हे होत. पुढील कोष्टकावरून सन १८९१ साली राखून ठेवलेले जंगल वेगळाले प्रांतांत किती होतें तें दिसून येईल. तुलनेसाठी सन १८८१-८२ चे आंकडे दिले आहेत. आंकडे चौरस मैलाचे आहेत. १८८१-८२ १८९१-९२ मद्रास. ११८२ ७१७५ मुंबई. ९७८९ १०३१८ बंगाल. ४२३६ ५२११ वायव्यप्रांत. ३३२६ ३७६८ पंजाब. ११६० १७१५ मध्यप्रांत. १९४३० १९६८० आसाम. २०६६ वहाड. १३९४ १२५६ कुर्ग. २३४ अजमीर. १२२ १३९ वरचा ब्रह्मदेश. १०५९ खालचा ब्रह्मदेश. ३२७४ ५६१५ ११३ ४६२१३ ५९७४३*

  • यांत बलुचिस्थानांतील ८२ मैल येतात.

जंगल राखून ठेवतांच त्याच्या हद्दी ठरविण्यात येतात व हक्कांबद्दलही चौ- कशी होते. दरसाल दोन तीन हजार चौरस मैलांची हिंदुस्थानचे सर्व्हेचे खात्या- कडून मोजणी होते. ह्या मोजणीने कामाचे बेत करण्यास फार मदत होते. गुरचरणांचे संबंधाने व्यवस्था वेगळाले प्रांतांत वेगळाले रीतीची आहे. बंगा- ल्यांत ७६९ चौरसमैल जमीन या कामासाठी सोडलेली आहे. मध्यप्रांत, पंजाब व वायव्यप्रांत यांत जंगलापैकी शेकडा ७० टक्के जमीन या कामास देण्यांत