पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७ दुशांत उत्तरेस व आसामाचे आग्नेयेस रबराची झाडे आहेत. घाटांत व विशे- षकरून झैसूर व कुर्ग प्रांती चंदन पुष्कळ आहे. बांबू तर सर्वत होतो व वाय- व्येकडे राटेन (वेत) होतो. जंगलाची व्यवस्था सन १८७८ चे हिंदुस्थानसरकारचे कायद्याप्रमाणे चालते. त्याप्रमाणे जंगलाचे “ राखून ठेवलेली", " संरक्षण केलेली", व “ गांवकीची असे वर्ग केले आहेत. जंगले राखून ठेवण्याचा विधि असा आहे की, पहिल्याने अमुक जमिनी राखलेले जंगल करण्याच्या आहेत अशी जाहिरात देण्यांत येते, व नंतर त्या जमिनीवरील खासगी किंवा गांवकचेि हक्क असतील त्यांचा तपास होउन त्यांची व्यवस्था लावल्यावर जंगलाच्या हद्दी ठरवून ठिकठिकाणी हद्दी- च्या खुणा घालण्यांत येतात. हे काम साधारण मुलकी खात्यांतील अधिकाऱ्यां- कडून होतें. इतर वर्गाचे जंगलांपेक्षां या राखलेले जंगलांत सरकारचे इच्छे- प्रमाणे सर्व व्यवस्था पूर्णपणे अमलांत येते. जंगलाचे कायद्यांत जंगल राखणे, त्याची व्यवस्था करणे, व जंगलाचे उत्पन्न करणे, व त्यासंबंधाने कर घेणें या- बद्दल नियम आहेत. जंगले कोणते ठिकाणी किती व कसे प्रकाराने ठेवण्याची व त्यांचे उत्पन्नाबद्दल काय व्यवस्था करण्याची या बाबतीत प्रत्येक प्रांताबद्दल लोकस्थितीचा व त्यांचे जरूरीचा विचार करून तच्छास्त्राभिज्ञ अधिकारी वर्गा- कडून ते ठरविलेले असते. यास कामाचे बेत (वर्किंग प्लान्स् ) असें ह्मणतात. जंगलखात्याकडे जमीन आल्यावर पुढे तिची व्यवस्था त्या खात्याचे लोकां- कडून शास्त्रीय तत्वांप्रमाणे होते. तरीही जेथे जळण व गुरे चरणीचे कामासाठी- च मुख्यत्वेकरून जंगल राखलेले असेल, किंवा त्याचे व्यवस्थेशी रयतेचे नफा- नुकसानीचा संबंध येत असेल असे ठिकाणी मुलकी व जंगल खाती ही एकमे- कांचे सल्लामसलतीने कामें चालवितात. जंगलखालांतील व्यवस्था पाहणारे कामगारांपैकी काही त्या विषयाचा विशेष अभ्यास केलेले विलायतेंतून नेमून येतात व काही हिंदुस्थानांत नेमण्यांत येतात. त्या सर्वांवर देखरेख इन्स्थेकर जनरल हिंदुस्थाभर करतो. जंगलचे अंमलदारांत वरिष्ट दर्जाचे झणजे कानसरवेटरचे कामावर त्या विषयाचा विशेष रीतीने अभ्यास केलेले लोकच नेमण्यांत येतात. सन १८८५ सालापर्यंत हिंदु- स्थानांतून निवडक उमेदवार, जर्मनी किंवा फ्रान्स देशांत या विषयाच्या शाळा आहेत त्यांत, शिकण्यास पाठविण्यात येत असत ; परंतु त्या साली कूपर्सहिल येथे असलेले कालेजास जंगलखात्यांत उपयोगी असे विषय शिकविण्यास वर्ग जोडण्यांत आले. तेथे तयार झालेले लोकांस प्रथमतः एक फारेटचे मुख्य हपिसांत काही दिवस ठेवण्यात येते; तेथे त्यांनी देशभाषेचा अभ्यास केल्या- 2