पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३८ ) वाय ज्यांत कोणतेही प्रकारची वृक्षवृद्धि होत नाही असा भूमिभाग या देशांत फार थोडा आहे; एक रीतीने पाहिले तर सर्व वसाहत जंगल तुटूनच झालेली आहे. हा निर्वृक्ष करण्याचा क्रम काही ठिकाणी इतके थरास गेलो आहे की, लोकांस जळणाचा निर्वाह जमिनीचे सुपीकपणास अत्यंत उपयोगी असे गुरांचे उत्सर्ग लांजवरच करावा लागतो, व ही स्थिति जमिनीचे पोषक शक्तीस पातु- क होते. मोठाली इमारती लांकडांची राने राखणे व तयार करणे एवढ्याच कामांत जंगलखात्याचा उपयोग होईल असें नाही, तर गृहाग्नीची तजवीज ठिकठिकाणी वृक्षवृद्धि करून त्याजवर लाऊन, जमिनीस लागणारे पोषक पदार्थ जे हल्ली ज्वलनक्रियेस जातात ते भूमिगत होतील असें केलें ह्मणजे या खात्या- पासून सर्व देशांस अत्यंत फायदा होणार आहे व कृषिकर्मावर तर त्याचा फार- च चांगला परिणाम होईल. जंगलाचा व पर्जन्यवृष्टीचा कार्यकारणसंबंध अजून जरी अनुभवसिद्ध झालेला नाही, तरी नद्यांचे व ओढ्यांचे उगमप्रांत वृक्षमय असल्याने पूर वगैरेंचे स्वरूपाने समुद्रास्तृप्यंतु न होता, ती वृष्टी या वृक्ष- वाटिकेत संचित होते व तो संचय खालील प्रांतास दीर्घकाल उप- योगी होतो हे सिद्ध झाले आहे. निवृक्ष करण्यचा क्रम कृषीवलांक- डून व वननिवासी लोकांकडून फार काल चालू आहे व वनसंरक्षण- क्रिया अगदी अलीकडे चालू झाली आहे, तेव्हां सर्व व्यवस्था ठीक लागण्यास बराच काळ जावा लागेल. जंगल कमी झाल्याने गुरांचे चरण्याचीही फार अड- चण झाली आहे; शेतकीचे कामास व दुधाचे पुरवठ्यास जितके जनावरांची जरूर लागते तितके जनावरांची मात्र योग्य जोपासना होते; बाकीचे जनाव- रांस मिळेल तेथें असेल तितका चारा खाउन काळ कंठून अखेरीस कष्टमय जीवयात्रा पुरी करावी लागते. जनावरांस चाऱ्याचा सुकाळे होण्याची तजवीज पड जमिनीची राखण करून करणे हे जंगलखात्याचे काम झाले आहे. असे प्रकाराने इमारतीची व इंधनाची लांकडे पुरवून गृहकार्यास, व जनावरांस चारा व शेतास खात ही मिळेशी करून शेतकीस व वृक्षवृद्धि व संरक्षण यांचे द्वारें पर्ज- न्यराजाची कृपा संपादन करून लोकांची सर्वत्र अबादी करण्यास जंगलखातें फार उपयोगी आहे. इमारती लांकडांत सागाचा पहिला नंबर आहे, तो उत्तरब्रह्मदश. कानडा, मलाबार व घाटांचे भाग, सातपुडा, विध्यादि प्रांत येथे ( परंतु सवात उत्तम ब्रह्मदेशांत) होतो. वायव्य, बंगाल, आसाम वगैरे प्रांतांत हिमालयाचे पाय- थ्याशी साल झाडे होतात व हिमालयांत गंधसरू वगैरे झाडे होतात. आसाम व ब्रह्मदेशांतील हिमालयाचे खालचे ओळीत देवदारू वगैरे झाडे आहेत. ब्रह्म-