पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३७) ऊन फार दिवस झाले नाहीत, यामुळे सिद्धान्त ठरविण्यास पुरेशी माहिती अ- जून गोळा झालेली नाही. सर्व उद्योगाचे इष्ट पर्यवसान सरकारास पुढे पडणारे पावसाचा अंदाज आगाऊ कळून विशेष आप्ती होण्याचा संभव असल्यास योग्य त्या तजविजी करण्यास सवड मिळावी हे आहे व तें साध्य करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. हल्ली जमिनीवर पाऊस, हवामान व वायूची गति यांबद्दल जशी नोंद ठवे. ण्यांत येते तशीच समुद्रांतून येणारे गलवतावरही ठेवण्यात येते व दोन्ही ठि. काणी मिळविलेले माहितीचा मेळ घालण्यांत येउन वादळे, झंजावात, तुफान वगैरेंचा उगम शोधण्यांत येतो. समुद्रावर तुफान होण्याची चिन्हें दिसून आल्या- स त्याबद्दल दर्यावर्दी लोकांस सूचना देण्यात येते. खंबायतेचे आखातास मिळ- णारे नद्यांस पूर एकदम येतात ह्मणून त्या नद्यांचे उद्गमस्थानी जास्त पर्जन्य- वृष्टी झाली ह्मणजे त्यांचे कांठचे शहरांस त्याबद्दल सूचना देण्यात येते. या- शिवाय हिमालय व दुसरे त्याचे जोडीचे पर्वत यांवर बर्फ पडतें त्यांत कांहीं मेळ असतो किंवा कसे, व पर्जन्य व जंगल यांचा परस्पर कार्यकारणसंबंध कसा आहे वगैरे गोष्टींबद्दल शोध चालू आहेत. या खात्यांतून जी माहिती मि- ळविण्यांत येते तिचे अनुरोधानें पत्रके व नकाशे वारंवारे प्रसिद्ध करण्यांत येतात. या देशांत मिळविण्यांत आलेले माहितीचा शास्त्रीय दृष्टीने विचार याच देशांत होतो असें नाही, तर ती माहिती युरोप व उत्तरअमेरिका देशांतील शास्त्रज्ञ लोकांकडे विचारासाठी पाठविण्यात येत असते. या कामासाठी या देशांत ४ पहिले वर्गाची व ६४ दुसरे वर्गाची व ९७ तिसरे वर्गाची निरीक्षणस्थले आहेत. याशिवाय निकोबार व झांझिबार येथेही माहिती मिळविण्यासाठी स्थळे स्थापन केली आहेत. या खात्याचा खर्च सन १८८१-८२ साली रु. १४८७४० व सन १८९१-९२ साली रु. २७१९९० असा झाला होता. भाग बारावा. जंगलखाते. हिंदुस्थानांत नैसर्गिक उत्पन्नाचे बाबतींत लागवडी जमिनीचे उत्पन्नाचे खा- लोखाल जंगलचे उत्पन्नाचा नंबर येतो. पश्चिमेकडील वालुकामय मैदानाशि-