पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३६) शेतकीचे स्थितीसंबंधाने आणखी एक बाबतीत माहिती दाखल करून हा भाग पुरा करण्याचा आहे. शेतकांचे मालाची किंमत जशी वाढत जात आहे तसाच मजुरीचा दरही वाढत जात आहे. हा किती वाढला आहे ते खालील आंकड्यांवरून दिसून येईल. शेतकीची घोडेवाल्यास सुतार-लोहार वगैरेस मजुरी. मजुरी. मजुरी. रु. आ. पै. रु. आ. पै. रु. आ. पै. १८७३-७६ ६.११.१ १४.९.२ १८७७-८१ ६.७.११ १४.११.११ १८८२-८६ ६.११.११ १५.११.१० १८७७-९१ ७.१.८ ६.१५.८ १६.१४.५ यावरून असे दिसते की शेतकीवर मजुरी करणारांचा मजुरीचा दर शेकडा सुमारे दहा टक्के चढला आहे ; घोडेवाल्याचा ८ टक्के व गवंडी वगैरेंचा सुमारे १६ टक्के वाढला आहे. शेतकीचे मालाची किंमत किती वाढली आहे ते शेकडावळीचे प्रमाणानें पहातां, सन १८७३ सालापासून तांदुळाची किंमत ४९ टक्के, गव्हाची ३५ टक्के, ज्वारीची ३८ टक्के व वाजेरीची ३७ टक्के अशी वाढली आहे. मीटेभारालजी-विद्युल्कावायचक्रशास्त्र. हिंदुस्थानासारखे उष्ण कटिबंधांतील देशांत पर्जन्यावरच जीवनाची साधनें अवलंबून असतात; तेव्हां मथळ्यावर लिहिलेले आकाशस्थ चमत्कारांचे उद्घाटन होणे अत्यंत महत्वाचे असते. पर्जन्य कधी सुरू होईल. तो किती पडेल, वारा कोणीकडून किती जोरानें वहात आहे व त्याची धोकादायक गति कोठे झाली आहे किंवा काय वगैरे माहिती योग्य वेळी मिळाल्यास सरकार व रयत या उभयतांसही उपयोगी होते. पर्जन्य किती पडला व हवेचें मान कसें होतें ह्याबद्दलचे निरीक्षण सुरू झाल्यास फार दिवस झाले आहेत तरी अलीकडेसच या खात्याचे कामांचा फार विस्तार करण्यांत आला आहे व निरीक्षणस्थलेही जास्त स्थापन करण्यांत आली आहेत. आतां वेगळाले ठिकाणांहून हवामाना- बद्दल माहिती मिळवून ती एके ठिकाणी करून सिमला, कलकत्ता व मुंबई या ठिकाणी दररोज दुपारचे आंत प्रसिद्ध करण्यांत येते. हे खातें सुव्यस्थित हो-