पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४.३९ पुणे उ ४३०१ मद्रास ही वाढली आहे, या गोष्टी वाढीचा विचार करतांना ध्यानात ठेवण्यासार- ख्या आहेत. आतां शहरांत व बाहेरील प्रांतांत कशी वाढ झाली आहे ते पाहणे आहे. इंग्रजी राज्यांतील व संस्थानांतील शहरें घेतली तर शहरांतील वस्तीची वाढ सामान्य प्रमाणाचे जवळ जवळ आहे. दहा हजारांचे वस्तीचे शहरांतील बाढ ह्या साधारण प्रमाणापेक्षा कमी झाली आहे; मोठे वस्तीचे शहरांत, ज्यांचें महत्व व्यापार, कारखाने व आगगाड्या, किंवा सैन्याचे वास्तव्याचे कारणाने वाढले आहे अशांतच वाढ जास्त झालेली आहे. उदाहरणासाठी काही शहरे पुढे दिली आहेत. मुंबई ६.२८ रंगून २४३८ कलकत्ता ८२५ कराची अजमीर ४१२६ १६.५० कानपूर २४.६१ हुबळी ४३४० ज्या शहरांची पूर्वी भरभराट असून आतां खालावली आहेत अशा शहरांत वस्तीची वाढ झालेली नाही. उदाहरणार्थ पाटणा, सुरत, मिरझापूर. यावरून एकंदरीत शहरांकडे लोकांचा ओढा कमी दिसतो व जो ओढा आहे तो लहान व्यापारी व खालचे दर्जाचे मजूरदार यांत आहे. लोकसंख्येत वाढ कशी झाली आहे यासंबंधाने येथपर्यंत वर्णन झालें. आतां वाढ होण्यास किंवा न होण्यास कारणे काय होतात ते पाहिले पाहिजे. विलाय- तेचे मानाने पहातां या देशांत लोकसंख्येच्या वाढीचे प्रमाण फार मोठे आहे. यास कारणे अशी दिसतात की, या देशांत नरकोत्तारणार्थ मुलगा असणे जरूर आहे असा साधारण समज आहे व स्त्रियांची मदत प्रपंचाचे कामांत फार होते व स्त्री अविवाहित राहणें अशास्त्र समजले जातें यामुळे विवाह फार होतात. आतां बालविवाहाचे चालीपासून प्रजा जास्त होते असे जरी नाही तरी होते ती अशक्त होते व त्यांच्या आया वाळंतपणांतच बरेच वेळां गचावतात किंवा त्यांचे प्रजाजननाचे सामर्थ्य लवकर कमी होतें ; व या कारणामुळे या देशांत आयुर्मर्यादा विलायतेपेक्षां कर्मी आहे. अर्थातच त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही तिकडचेपेक्षा जास्त आहे, व त्यास सदरचे कारणांशिवाय हवापाण्याचे फरक व त्यामुळे होणारा रोगोद्भव हेही कारण आहे. या नेहमीचे कारणाशिवाय पटकी, देवी, वगैरे साथींची मदत असते व मधून मधून दुष्काळही पुरवणी करतो. देशाचे नैसर्गिक स्थितीमुळे शेतकीवर निर्वाह करणारे लोक फार आहेत व सामा-